‘पान सिंह तोमर’ अर्थात अभिनेते इरफान खान यांचे निधन - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, April 29, 2020

‘पान सिंह तोमर’ अर्थात अभिनेते इरफान खान यांचे निधन


मुंबई / प्रतिनिधी

     ‘पान सिंह तोमर’ लंचबॉक्स यासारख्या सिनेमामधून प्रेक्षकावर अधिराज्य गाजविणारे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचे आज दि. २९ रोजी अकाली निधन झाले.

काल अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफानला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. तर सकाळीच इरफानच्या प्रवक्त्याने कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र यानंतर काहीच तासात इरफानच्या यांच्या मृत्यूची बातमी आली. 2018 मध्ये इरफानने त्याच्या आजाराबद्दल आपल्या फॅन्सना सांगितले होते. इरफानला न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर हा आजार होता. इरफानच्या आजारावर लंडनमध्ये उपचार सुरु होते. दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये इरफान भारतात परतला होता. यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमाचे शूटींग सुरु केले होते. नुकताच हा सिनेमा रिलीज झाला होता़ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.  राष्ट्रीय फिल्म पुरस्कार २०१२ मध्ये इरफान खान यांना पान सिंह तोमर या सिनेमातील अभिनयासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार दिला गेला होता. इरफान खान यांनी हॉलीवूड मधील ए माइटी हार्ट, स्लमडॉग मिलीयनेयर, द अमेजिंग स्पाइडर मैनया चित्रपटामध्ये काम केले आहे. २०११ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कराने सन्मानित केले होते.

Pages