निष्काळजीपणे कार चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरूध्द गुन्हा दाखल - Pantnagari Times

Breaking News

Saturday, April 11, 2020

निष्काळजीपणे कार चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरूध्द गुन्हा दाखल


मंगळवेढा / प्रतिनिधी

निष्काळजीपणे कारगाडी चालवून लिंबाच्या झाडाला जोराची धडक देवून ड्रायव्हरशीट शेजारी बसलेला शंकर शिवाजी पुंदे(वय 23 रा. भोसे) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी  आरोपी रविकिरण सदाशिव पाटील याच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेची हकिकत अशी,दि.10 रोजी संध्याकाळी 4.45 वा. यातील फिर्यादी रामदास महाडिक यांचा भाचा तथा मयत शंकर पुंदे हा त्याचा मित्र तथा आरोपी व चालक रविकिरण पाटील यांचेसोबत स्विफ्ट कार एम एच 12 आर एन 2070 मध्ये बसून मळणी मशिन आणण्याकरीता जात असताना भोसे-आवताडे वाडी रोडवर ऐवळे यांच्या शेतालगत डांबरी रोडवर आरोपीने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या लिंबाचे झाडाला जोराची धडक दिल्याने कारमध्ये चालकाशेजारी बसलेले मयत शंकर पुंदे याच्या डोकीस जबर मार लागून गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले.तसेच कार स्विफ्ट गाडीची मोडतोड होवून नूकसान झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या अपघाताचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे करीत आहेत.

Pages