मंगळवेढा / प्रतिनिधी
इंग्लिश स्कूल मंगळवेढा या प्रशाललेची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी ऋतुजा नागनाथ जोध ही जानेवारी 2020 मध्ये झालेल्या मंथन प्रज्ञाशोध राज्यस्तरीय परीक्षा परीक्षेत 266 गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात प्रथम आली आहे ऋतुजा ही नेहमी स्पर्धा परीक्षेत जिल्हा व राज्य स्तरावर यशस्वी होते तिला प्रशालेचे शिक्षक सतीश सावंत,व्ही.डी माने, शिवलिंग राऊत, या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून ऋतुजा ही भोसे महसूल विभागाचे मंडळ अधिकारी नागनाथ जोध यांची कन्या असून तिच्या या यशाबद्दल मंगळवेढा विभागाचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे,व सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी तसेच इंग्लिश स्कूल मंगळवेढा या संस्थेचे अध्यक्ष सुजित कदम मुख्याध्यापक चव्हाण व मंथन परीक्षा मंगळवेढा केंद्राचे आयोजक शिक्षक दामाजी माळी, यांनी कौतुक व अभिनंदन केले
भोसे गावचे सर्व ग्रामस्थांनी ऋतुजा जोध हिचे अभिनंदन व कौतुक केले असून तिच्या भावी शिक्षणासाठी शुभेच्छाही दिल्या