मंगळवेढा / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू आहे. शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करणे हे सर्वांचे कर्तव्य असल्यामुळे मंगळवेढा तालुक्यात यावर्षी २६ एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर महाराज जयंती प्रत्येक भक्ताने आपल्या घरी प्रतिमेचे पूजन करुन साजरी करावी असे आवाहन माजी सभापती शिवानंद पाटील यांनी केले आहे.
महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने बसव उत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जातो. तसेच बसवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन केले जाते. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाचे भीषण संकट परतविण्यासाठी महात्मा बसवेश्वर महाराज
यांची जयंती आपल्या घरी साजरी करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन समितीने केले आहे.
सर्व लिंगायत बांधवांनी घरातच प्रतिमेचे पूजन करून, महात्मा बसवेश्वरांचे विचारांचे स्मरण करून त्यांचे कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे. सध्या देशावरच्या या संकटात घराबाहेर बाहेर न पडता महात्मा बसवेश्वर हे प्रत्येकाच्या मनामनात आहेत. हे दाखवून देऊया व महात्मा बसवेश्वर जयंती घराघरात साजरी करूया, असे आवाहन माजी सभापती शिवानंद पाटील यांनी केले आहे.