पंढरपूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात चर्मकार समाजातील असंख्य मजूर कामगार,कारागिरी,बूट पाॅलिसी करणारी गटई कामगार हात मंजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.परंतू आज पडीला कोरोनाने संपूर्ण विश्वाला विकाख्या घातला आहे.व त्यांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शासनाच्या वतीने लाॅकडाऊन घोषित करण्यात आली आहे. त्या ज्यांचे हातावरचे काम आहे असे गोरगरीब चप्पल,बूट बनविणारे कारागिरी रेल्वे,बसस्थानक,
बाजरपेठ,मध्ये फिरून बूट आणि बुटाचे सोल विकणारे कामगार तसेच रस्त्याच्याकडेला ऊन,वारा,छत्री,धरून चप्पल व बूट दुरुस्तीचे काम करणारे सर्वच गटई कामगार यांची लाॅकडाऊनमध्ये मोठ्याप्रमाणात नुसकान होत आहे.उदरनिर्वाह करणाचे साधन ठप्प झाले आहे. तसेच त्यांच्याजवळ असलेल्या थोडाफार पैसाही आजामितीला संपलेला आहे.परंतू 20एप्रिल नंतर लाॅकडाऊनच्या नियामात शिथिलता दिली असलीतरी पुन्हा मंजुरीसाठी भांडवल नसल्यामुळे समाज बांधवमोठ्या संकटात सापडले आहेत.
म्हणून या अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक समाजाला पुन्हा आपल्या पारंपारागत व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच लाॅकडाऊन काळात झालेल्या आर्थिक नुकसानातून सावरण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व कामगारांना किमान 15हजार आर्थिक मदत कुटूंब प्रमुखांच्या खात्यावर जमा करण्यात यावी.असे निवेदनाव्दारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. आपण जर मदत जाहीर नाही केलतर महाराष्ट्रातील चर्मकार समाजातील असंख्य मजूर कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येईल.असे मत शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी व्यक्त केली आहे.