मंगळवेढा / मदार सय्यद
--------------------------------
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हुन्नूर गाव सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय हुन्नूरग्रामपंचायत व ग्रामस्तरीय व्यवस्थापन समीती यांनी घेतला आहे. दिनांक २५एप्रील ते २७ एप्रील शनिवार,रविवार व सोमवार या दिवशी हुन्नूर गाव संपूर्णपणे बंद राहणार आहे.अत्यावश्यक सेवेमधील मेडिकल,दवाखाने हेच फक्त सुरु राहतील.सोलापूर शहरामध्ये कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील सर्वच गावात टप्याटप्याने कडकडती बंद पाळला जात आहे.हुन्नूर गाव हे सांगली जिल्हा हद्दीवरती असून मोठी बाजारपेठ असल्याने आसपासच्या अनेक गावातील नागरिकांचे व्यवहार हुन्नूर येथे असल्याने मोठ्याप्रमाणात लोकांची ये जा असते.२२मार्चपासून लागू केलेल्या लाँकडाऊनला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही.नागरिक विनाकारण घराबाहेर मोठ्यासंख्येने पडत आहेत.सोशल डिस्टनसिंग पाळले जात नाही त्यामूळे गावातील प्रमूख चौकाचौकात गर्दीचे चित्र पाहयाला मिळत आहे.
"सुरक्षेच्या दृष्टिने खबरदारीचा उपाय म्हणून व कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सलग तीन दिवस हुन्नूर गाव बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय हुन्नूर ग्रामपंचायत व ग्रामस्तरीत व्यवस्थापन समीती यांनी घेतला आहे."
सिकंदर इनामदार ग्रामसेवक हुन्नूर