मंगळवेढा / प्रतिनिधी
हुन्नूर (ता.मंगळवेढा) येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत मोफत मिळणाऱ्या गॅसचे अर्पिता भारत गॅस एजन्सीच्या वतीने घरोघरी वाटप करण्यात आले आहे. अर्पिता भारत गॅस एजन्सीने राबविलेल्या या उपक्रमाचे महिला वर्गातून स्वागत होत आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन परिस्थिती आहे. सर्वच व्यवहार ठप्प असल्यामुळे अनेक गोरगरीब कुटूंबाचे मोठे हाल होत आहे. ही परिस्थिती डोळ्यासमोर ठेवत शासन सध्या विविध प्रकारे गोरगरिबांना मदत करीत आहे. यामध्ये ज्या गोरगरीब महिलांना उज्वला गॅस योजनेअंतर्गत मोफत गॅस मिळाले आहेत. त्या सर्व महिलांना तीन गॅसच्या टाक्या मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यानुसार सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत.यावेळी एजन्सी चालक दत्तात्रय खटकाळे व प्रशांत काशीद यांचे हस्ते महिलांना गॅसचे वाटप करण्यात आले.
*सध्या संचारबंदी असल्यामुळे गाडीवरून प्रवास करून गॅसची टाकी देणे जिकिरीचे बनत चालले आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मोफत मिळणारा गॅस नेण्याकरिता महिला सोबत असणे गरजेचे आहे. महिलांना मोफतचा गॅस मिळवण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून आम्ही घरोघरी गॅसची टाकी पोहोच करण्याचा निर्णय घेतला.*
दत्तात्रय खटकाळे एजन्सी चालक