मंगळवेढा / प्रतिनिधी
--------------------------------
कोरोना विषाणू साथीने रोजगाराच्या वाटा बंद झाल्या आहेत. लॉकडाउन असल्याने बंद दरवाज्यांच्या आत अनेक कुटुंबांना उपाशीपोटी जगावे लगत आहे. भीषण वास्तव समोर दिसत असल्याने मंगळवेढा तालुक्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या आवाहनानुसार दानशूर व्यक्तींनी केलेली मदत गोरगरीब जनता कधी विसरणार नाही असे विठ्ठल सहकारी कारखान्याचे संचालक भगीरथ भालके यांनी हुन्नूर येथे पंतनगरी टाईम्सशी बोलताना सांगितले
ग्रामपंचायत हुन्नूर तालुका मंगळवेढा येथील शासनाच्या संकल्पनेतून सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत व गावातील दानशूर लोकांच्या उपक्रमातून 61 गरीब कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.
संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे त्यामुळे हुन्नूर गावात १०० टक्के लॉकडाऊनचे पालन केले जात आहे.कोरोना व्हायरसचा संसर्ग गावात होऊ नये म्हणून लोकं घराबाहेर जात नाहीत. त्या कारणाने रोजगार नाही.गावात जवळपास १००ते १५० कुटुंबे रोजंदारीचे काम करुन उदरनिर्वाह करतात मात्र गेल्या १५ दिवसापासून रोजगार नाही. लोकांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.लोकांची हीअडचण लक्षात घेऊन शासनाच्या संकल्पनेतून सरपंच मच्छिंद्र खताळ व ग्रामसेवक सिकंदर इनामदार यांनी अन्नधान्य वाटप करण्याचे ठरविले.
*तहसीलदारांनी घेतला हुन्नूर गावचा आढावा*
तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी हुन्नूर गावचे सरपंच मच्छिंद्र खताळ यांच्याकडून संपूर्ण गावचा व परिसराचा आढावा घेतला यामध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन गावातील सर्व नागरिक करतात का जवळ सांगली जिल्ह्याचे हद्द प्रारंभ होते तरी सतर्क राहण्याचे आदेश दिले व परगावाहून येणाऱ्या नागरिकावर लक्ष ठेवण्याची यावेळी सूचना दिल्या
----------
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, तहसीलदार स्वप्नील रावडे, गाव कामगार तलाठी एन.एच.मौलवी ग्रामसेवक सिकंदर इनामदार, रेवेवाडीचे माजी सरपंच जगन्नाथ रेवे, शाहीर यशवंत खताळ,हुन्नूरचे सरपंच मच्छिंद्र खताळ, माजी उपसरपंच राजाराम पुजारी, ह.भ.प व्होनमोरे महाराज,गुलाब माने शहाजी सूर्यवंशी,काशिलिंग खताळ,ग्रामपंचायत सदस्य सुरेश साळुंखे सौदागर माने नितीन सूर्यवंशी विजय चव्हाण ग्रामपंचायत शिपाई पांडुरंग शिंदे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण कोरे,विकास पुजारी किरण पाटोळे,रशीद मुलानी दिलीप साळुंखे,रवी पाटील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल व्होनमाने यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक सिकंदर इनामदार यांनी केले