मंगळवेढा / मदार सय्यद
कोरोना संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी मंगळवेढा पोलिस स्टेशन येथे रत्नप्रभा सोशल फौंडेशन या संस्थेने स्वयंचलित निर्जंतुकीकरण शॉवर बसविण्यात आला आहे.दरम्यान पोलिस स्टेशनमध्ये येणार्या प्रत्येक नागरिक व पोलिस कर्मचार्यांवर स्प्रे होत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मदत झाली आहे.
कोरोना संसर्गजन्य आजाराने सर्वत्र धुमाकुळ घातल्याने प्रत्येकजण हतबल होत आहे.याला अटकाव करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठे प्रयत्नही केले जात आहेत.मंगळवेढा येथील रत्नप्रभा सोशल फौंडेशन या संस्थेने मंगळवेढा पोलिस स्टेशनच्या गेटवर स्वयंचलित निर्जंतूकीकरण शॉवर बसविण्यात आले आहे.नागरिकांचा पाऊल या कक्षात पडताच स्वयंचलित पध्दतीने शॉवर आपोआप चालू होवून नागरिकांच्या अंगावर फवारा उडत असल्याने संपूर्ण शरीर निर्जंतुकीकरण होत आहे.बाहेर जातानाही याच पध्दतीचा अवलंब होत असल्याने कोरोना संसर्गजन्य आजाराला अटकाव होण्यास मदत झाली आहे.मंगळवेढयात पहिलाच हा प्रयोग राबविण्यात आला आहे.स्वयंचलित निर्जंतूकीकरण शॉवर शुभारंभप्रसंगी संस्थेचे विश्वस्त राहूल शहा,पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे,सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे,हरीदास सलगर,अमर सुरवसे,सागर शहा,जनार्धन शिवशरण आदी उपस्थित होते.
🔰छायाचित्रांमध्ये....
मंगळवेढा पोलिस ठाण्यात स्वयंचलित निर्जंतुकीकरण शॉवरचे शुभारंभप्रसंगी राहुल शहा,पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे,भगवान बुरसे,जनार्धन शिवशरण यांचेसह अन्य कर्मचारी दिसत आहेत.