मंगळवेढा / मदार सय्यद
--------------------------------
कोराना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मंगळवेढा तालुक्यातील नंदूरच्या फॅबटेक शुगर या खाजगी साखर कारखान्याला सॅनिटायझर उत्पादन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या होत्या त्यांच्या सूचनेचे पालन करत बाजारात झालेला सॅनिटायझरचा तुटवडा भरून काढण्यासाठी फॅबटेक शुगर ने याची निर्मिती केली असून पाहिले उत्पादन प्रशासनातील अधिकाऱ्यांना वाटप कारन याचा शुभारंभ केला आहे या तयार केलेल्या सॅनेटायझरचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील व तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर,आवताडे शुगरचे अध्यक्ष संजय आवताडे,अध्यक्ष सरोज काझी,पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण ,दामाजी कारखान्याचे संचालक विजय माने, पप्पू काकेकर ,कार्यकारी संचालक मोहन पिसे,ह.भ.प.तुकाराम महाराज,
डिसलरी मॅनेजर चेतन काळे,वित्तअधिकारी रघुनाथ उन्हाळे, प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर बळवंतराव आदीसह कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना साथीचा प्रादुर्भाव देशात सुरू झाल्यापासून सॅनेटायझर ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली परंतु मागणीप्रमाणे त्याचा पुरवठा बाजारात उपलब्ध नसल्यामुळे त्याची विक्री चढ्या दराने होऊ लागली.त्यामुळेच जनतेला कमी पैशात ना नफा ना तोटा तत्वावर याचे उत्पादन करण्याची हमी नंदूर येथील फॅबटेक शुगर या कारखान्याने कमी कालावधीत हे बाजारात उपलब्ध करून दिले असल्याची माहिती यावेळी कारखान्याचे अध्यक्ष संजय आवताडे यांनी यावेळी सांगितले.या कारखान्याकडे शंभर मि.ली पासून पाच लिटर पर्यंत सॅनेटायझर उपलब्ध असून कमी काळात हे उत्पादन केल्यामुळे बाजारात झालेला तुटवडा भरून निघणार असून ग्राहकांना मागणीप्रमाणे हे उपलब्ध असून ज्या व्यापाऱ्यांना ग्राहकांच्या मागणीप्रमाणे हवे त्या प्रमाणात खरेदीसाठी कारखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष सरोझ काझी यांनी केले