सोलापूर जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांना संरक्षण विमा देण्यात यावा.शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे - Pantnagari Times

Breaking News

Monday, April 6, 2020

सोलापूर जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांना संरक्षण विमा देण्यात यावा.शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळेप्रतिनिधी / पंढरपूर

--------------------------

    संपूर्ण जगभरात कोरोना रोगाने थैमान घातले आहे.अशावेळी भारत देशात ही तीच परिस्थिती आहे.मात्र देश संकटात असतांना काही लोकांमुळे हे संकट अजून वाढते कि काय अशी शंका समाजामध्ये दिसुन येत आहे.

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे उद्भवलेल्या परीस्थितीवर मात करण्यासाठी सरकाराला सध्या सोलापूर जिल्हातील सर्वच जनता सहकार्य करत आहे.

कोरोनाचा काळातमध्ये अनेक गोरगरीबांच्या संसाराचा गाडा थांबू राहिल्यामुळे हातावरचे पोट असलेल्या लोकांना उपाशी मरणाची सध्या वेळ येवू नये.म्हणून शासनाने स्वस्त धान्य रेशन दुकानातून जीवनावश्यक वस्तू साहित्य गहू,तांदूळ,तेल,साबण,साखर  दिल्या जाणार आहे.त्यावेळी रेशन दुकानदावर मोठ्याप्रमाणात गर्दी होताना दिसून येते.अशावेळी रेशन दुकानदारांच्या आरोग्याला धोका निर्माण होणाचे चिन्हे दिसून येत

आहेत.त्यांच्या आरोग्याला धगाफडका बसू नये.त्यासाठी सर्व गोष्टींचा विचार करून महाविकास आघाडी सरकाराचे  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी मुख्यमंत्री सहाय्य निधीतून रेशन दुकानदारांना संरक्षण विमा देण्यात यावा.अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे

Pages