मंगळवेढा / प्रतिनिधी
कोरोनावर विजयाला बळ देणार बळिराजा कोरोनाच्या महामारीत अन्नधान्याच्या तुटवड्याने भूकबळी जाऊ नयेत. म्हणून शासनाने जगाचा पोशिंदा बळिराजाकडे "धान्य दान' मागितले आहे. याच हाकेला मुंडेवाडीकरांनी साद देऊन 20 क्विंटल ज्वारी दिली.भूकबळी न जाता कोरोनावर बळिराजाचा सहज विजय मिळवून देण्याचा हा एक प्रयत्नच आहे.असे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी मुंडेवाडी ता.मंगळवेढा येथील धान्यदान या कार्यक्रमात सांगितले.
लॉकडाउनमुळे देशासह राज्यातील काही कुटुंबे जिथल्या तिथेच क्वारंटाइन केली आहेत. त्यामुळे राज्यभर अनेक लोक अडकले आहेत. अशा भीषण परिस्थितीत अडकलेल्या लोकांना भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासकीय पातळीवर विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता देशात व राज्यात अन्नधान्याचा तुटवडा जाणवू नये म्हणून शासनाने उचललेले खबरदारीचे पाऊल म्हणजेच "धान्य दान' योजना होय. या योजनेत शेतकरी मोठ्या प्रमाणावर मदत करत आहेत. यातील एक उदाहरण म्हणजे मुंडेवाडी येथील शेतकऱ्यांनी केलेली मदत होय. येथील बळिराजाने सढळ हाताने तब्बल 20 क्विंटल ज्वारी दान केली आहे.
ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार मुंढेवाडी येथील शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. दोन दिवसांत 20 क्विंटल ज्वारी जमा करून ती सुपूर्द तालुका कृषी अधिकारी कडे सुपूर्द केली. यावेळी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले,माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकट(अण्णा) भालके,पंढरपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी आर,एम,कांबळे, मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी सी,बी, जांगळे, मुंडेवाडीच्या सरपंच सविता शिवाजी पाटील,मंडल कृषी अधिकारी मरवडे आर,डी,भांगे ,मंडल कृषी अधिकारी नंदेश्वर एस,पी, पुजारी, कृषी सहाय्यक पी,एस, काटे ,कृषी सहाय्यक मुंडेवाडी पी,पी,पाटील, माजी सरपंच नाना पाटील,राजू पाटील, रावसाहेब पाटील,महादेव घोडके,विठ्ठल ठेंगील,सुरेश चौगुले,मल्लिकार्जुन पाटील, दिलीप धसाडे,कल्लाप्पा पाटील,सचिन पाटील,पांडुरंग पाटील,गणपती धसाडे,राहुल पाटील,सुनील पाटील,सतीश पाटील,दगडू धसाडे,सिद्धेश्वर पाटील,अनिल पाटील,सुभाष पाटील,नवनाथ धसाडे,शिवाजी धसाडे,शरद चौगुले,लिंगाप्पा पाटील,अदी उपस्थित होते.