मंगळवेढा / मदार सय्यद
कोरोना विषाणू साथीने रोजगाराच्या वाटा बंद झाल्या आहेत. लॉकडाउन असल्याने बंद दरवाज्यांच्या आत अनेक कुटुंबांना उपाशीपोटी जगावे लगत आहे. भीषण वास्तव समोर दिसत असल्याने जिल्हा प्रशासनाने गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्याची संसार उपयोगी साहित्य किट वाटप करावे असे आव्हान केले होते या हाकेला हाक देत मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथील H.P.L ग्रुप (हुन्नूर प्रीमियर लीग. स्पोर्ट मधील सर्व खेळाडूंनी जीवनावश्यक वस्तूचे 20 किट गोरगरिबांना देऊन खिलाडी वृत्तीच दर्शन घडवले असे मंगळवेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान बुरसे यांनी सांगितले
हुन्नूर येथील H.P.L ग्रुप (हुन्नूर प्रीमियर लीग. स्पोर्ट मधील सर्व खेळाडूंच्या संकल्पनेतून व त्यांच्या उपक्रमातून 20 गरीब कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. ज्वारी दहा किलो,गहू दहा किलो, तांदूळ पाच किलो,गोडतेल एक किलो तूर डाळ एक किलो टोमॅटो दोन किलो,एक आंघोळीचा साबण,एक कापडाचा साबण, असे तीस किलो वजनाचे किट तयार करण्यात आले होते.संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे त्यामुळे हुन्नूर गावात १०० टक्के लॉकडाऊनचे पालन केले जात आहे.कोरोना व्हायरसचा संसर्ग गावात होऊ नये म्हणून लोकं घराबाहेर जात नाहीत. त्या कारणाने रोजगार नाही.गावात जवळपास १००ते १५० कुटुंबे रोजंदारीचे काम करुन उदरनिर्वाह करतात मात्र गेल्या अनेक दिवसापासून रोजगार नाही. लोकांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.लोकांची हीअडचण लक्षात घेऊन हुन्नूर येथील H.P.L ग्रुप (हुन्नूर प्रीमियर लीग. स्पोर्ट मधील सर्व खेळाडूंनी अन्नधान्य वाटप करण्याचे ठरविले. यावेळी पोलीस नाईक उदयजी ढोणे, पोलीस पाटील नामदेव रेवे, रामचंद्र बंडगर,राहुल कसबे,तूशांत माने,संदीप पवार,आदी उपस्थित होते.
यावेळी नारायण पुजारी (मेजर), हनुमंत यमगर,शरद चव्हाण,गणेश पुजारी,अनिल भोसले,बाबू माने,गणेश साळे,दीपक चंदनशिवे,उमिद सुतार,सुरज पुजारी,भिवा लवटे,नामदेव रेवे,डॉ.सहदेव गेजगे,विक्रम पुजारी,संतोष माळवे, विक्रम जालिंदर भोसले,संतोष मेटकरी,अनिल चव्हाण,रवी खडतरे,राहुल जाधव, रवी भोसले,पांडुरंग शेजाळ नंदेश्वर,डॉ.भारत काशीद,दत्ता चोपडे, तानाजी चोपडे,गणेश चोपडे,बाळू इमडे,दत्ता पुजारी,सुखदेव शेंडगे,बिरूदेव शेंडगे,शंकर पुजारी,संतोष मोरे,मुकुंद माने,सुरेश भोसले,गोपाल भोसले, अनिल गावडे,वैभव पवार, अनिल चौगुले,सोमा वाघमोडे, सचिन बंडगर,आदीनी धान्यदान केले.