मंगळवेढा / मदार सय्यद
---------------------------------
मंगळवेढा तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून राज्यात गाजत असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित 35 गावाच्या पाणीप्रश्नी जलसंपदा विभागाच्या बजेटमध्ये दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
तालुक्यातील बहुचर्चित 35 गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात गेल्या 35 वर्षापासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहे. यामध्ये मूळ पाण्याचा प्रश्न बाजूला रहात अनेकाच्या राजकीय पोळ्या भाजल्या पण आमदार भारत भालके यांनी या योजनेबाबतचा पाठपुरावा सोडला नाही. अशा परिस्थितीत 2009 साली पाण्यावरील बहिष्कारातून 35 पाणी प्रश्नावर आमदार भालकेंनी आमदारकी प्राप्त केली. सततच्या पाठपुराव्यानंतर 2014 साली दोन टीएमसी पाणी व योजनेस प्रशासकीय मान्यता घेत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पण राज्यात सत्ताबदलानंतर हा पाण्यासाठी पुर्नसर्वेक्षणाचे अडथळे आले. यासाठी आमदार भालके व 35 गाव जनतेनी याचिका दाखल केली. शासनाने पाण्यासाठी प्रतिज्ञापत्र दिले. दरम्यान, नव्याने केलेल्या सर्वेक्षणामध्ये दोन ऐवजी एक टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आल्यामुळे 9 गावाचा समावेश प्रस्तावीत केल्याने उर्वरित गावाचे काय असा प्रश्न लोकांसमोर उभा राहिला होता. पण राज्यात सत्तास्थापनेत नाट्यमय घडामोडीमुळे ही योजना पुर्नजिवित होण्याच्या आशा निर्माण झाल्या. अशा परिस्थितीत आमदार भालके यांनी दोन महिन्यापूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेत पूर्ण गावे व पूर्वीप्रमाणे मंजूर पाणी देण्याची मागणी लावून धरली. त्याप्रमाणे आजच्या बजेटमध्ये जलसंपदा विभागाच्या बजेटमध्ये दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यामुळे ही योजना मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या. त्यामुळे आता या योजनेबाबत असलेल्या अडचणी संपल्याचे निश्चित झाले.
---------------------------------------
तीन महिन्यात पर्यावरणाची मंजुरी घेणार मागील सरकारच्या काळात ज्यांनी तोंड देखील उघडले नाही तेच आज या योजनेसाठी निधी द्या म्हणून मागणी करू लागले. येत्या तीन महिन्यात पर्यावरणाची मंजूरी घेत जुलैच्या अधिवेशनामध्ये पुरवणी बजेटमधूतून निधी घेऊन तात्काळ कामाला सुरुवात करणार आहे. त्याच वेळी या योजनेला आलेले अडथळ्याचा सविस्तर उलगडा लोकांसमोर भूमिपूजनाच्या दिवशी करणार आहे.
- आमदार भारत भालके