पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरपूर येथे अखिल भारतीय वारकरी मंडळ आयोजित आंतरराष्ट्रीय ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नियोजनाची बैठक आज गुरुवर्य ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले महाराज यांच्या मठात त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.याबैठकित पारायण सोहळ्यास जे अन्नदाते दान करणार आहेत व त्यांनी आपला दानाचा संकल्प केला आहे आशांना संकल्प पावती दिली जाणार आहे त्या पावती बुकांचे आज पुजन पुढील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ह.भ.प.आभिमन्यु डोंगरे महाराज ,ह.भ.प.अशोक काळे महाराज ,ह.भ.प.संजय पाटील महाराज ,ह.भ.प.माऊली भगरे महाराज,विष्णू बाबा बोधले महाराज,सतीश पाटील महाराज,ह,भ.प.सोमनाथ घोगरे महाराज ,ह.भ.प.वाघ महाराज ,ह.भ.प.आण्णासाहेब शिंदे महाराज ,ह.भ.प.ज्ञानदेव भोसले महाराज ,ह,भ.प.ज्योतिराम चांगभले महाराज ,आदर्श ईंगळे महाराज ,संजय केसरे महाराज तसेच करमाळा महीला भजनी मंडळातील महीला यांच्या शुभहस्ते करण्यात आले.प्रदेशअध्यक्ष ह.भ.प.सुधाकर ईंगळे महाराज यांनी पारायण सोहळ्याची पंगत कशी असणार व नियोजन कसे असणार आहे हे आलेल्या वारकरी भाविक पदाधिकारी महाराज मंडळीना पटवुन सांगितले.ज्योतिराम चांगभले यांनी प्रस्तावना केली.याबैठकिस करमाळा तालुका,मोहोळ तालुका,दक्षिण सोलापूर तालुका,उत्तर सोलापूर तालुका,माळशिरस तालुका पदाधिकारी व श्री संत सावतामाळी महाराज महीला भजनी मंडळ शाखा मोहोळ सर्व पदाधिकारी हजर होते.