मंगळवेढा- प्रतिनिधी
------------------------------
सध्या आपल्या राज्यासह देशात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून महाराष्ट्र शासनाने संचार बंदी लागू केली आहे .
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे
उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदामंत्री जयंत पाटील आरोग्य मंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे..
त्यामुळे सर्व नागरिकांनी स्वतःसाठी आपल्या कुटूंबासाठी ,गावासाठी शासन व प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे.
संचारबंदीच्या काळात काही अडचणी आल्यास तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे त्या अडचणी मॅसेजद्वारे अथवा फोनद्वारे सांगा. प्रशासनाच्या माध्यमातून त्या अडचणी सोडवू. जीवनावश्यक वस्तुंची कोणतीही टँचाई निर्माण होणार नाही विनाकारण घराबाहेर पडून कोरोनाला आमंत्रण देऊ नका... सध्याची परिस्थिती नाजूक असल्याने प्रशासनाला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक , शेतकरी, कामगार, रोज हातावर पोट घेऊन जगणारे लोक यांचे हाल होत आहेत त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रशासन व मंत्रीमहोदय यांच्याशी चर्चा सुरू आहे त्यातून हे सरकार नक्कीच मार्ग काढेल परंतु आपण कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर न पडता सर्वांवरती आलेले कोरोनाचे संकट टाळण्यासाठी शासन व प्रशासनाला सहकार्य करण्याचे कळकळीचे आवाहन आमदार भारत भालके यांनी मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना केले आहे ..