मरून गेले धनी, आम्हाला मदत करेना कुणी! या हाकेला हाक देत मंगळवेढा तहसीलदाराचे चौकशी करण्याचेआदेश - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, March 17, 2020

मरून गेले धनी, आम्हाला मदत करेना कुणी! या हाकेला हाक देत मंगळवेढा तहसीलदाराचे चौकशी करण्याचेआदेश


मदार सय्यद /मंगळवेढा

----------------------------------

         मरून गेले धनी, आम्हाला मदत करेना कुणी! हुन्नूर येथील मुस्लिम कुटुंबाची दर्द भरी कहानी, या मथळ्याखाली  साप्ताहिक  पंतनगरी टाईम्स न्यूज पोर्टल वर बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती, की हुन्नूर ता. मंगळवेढा येथील दगडू हुसेन सुतार पत्नी रहमतबी, मुलगा आसीम, व उंबरद्दीन, ह्या चौघांचे  निधन झाले चार वर्षात होत्याचे नव्हते झाले. घरात फक्त  विधवा बायका व लहान लहान मुले आहेत भरीस भर म्हणून मुलगी लैला तिच्याही नवऱ्याचे निधन झाले आता खायचे काय जगायचे कसे असा प्रश्न सुतार कुटुंबा समोर पडला आहे

घरातील कर्ते पुरुषाचे निधन झाल्यावर घरातील महिलांनी संसाराचा गाडा हाकायचा कसा असा विचार करत आहेत महिला अमिनाबी सुतार, इंन्ताज व ननंद लैला, त्यांची मुले कौसर, जरीना, कासिम, लालसाब, ही मुले शिक्षण शिकत आहे, यांना शिक्षणाचा खर्च,व घरातील खर्च या तीन महिलानी कसा करायचा हा प्रश्न पडलेला आहे या कुटुंबाला राहायला घर नाही, रेशन मिळत नाही, रेशन कार्ड नाही, विधवा पेंशन मिळत नाही, प्यायला पाणी नाही, शेती आहे पण पी.एम.किसान योजनेचा लाभ मिळत नाही शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ या कुटुंबाला मिळाला नाही  अशी मागणी संदीप पवार  सामाजिक कार्यकर्ते जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोलापूर यांनी पंतनगरी टाईम्स न्यूज पोर्टल मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत मंगळवेढा तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी संबंधित कुटुंबाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आज सकाळी अकरा वाजता मंडलाधिकारी नागनाथ जोध, गावकामगार तलाठी एन. एच .मौलवी यांनी सुतार कुटुंबांची  भेट घेऊन अहवाल लिहून घेऊन  तहसीलदार यांच्याकडे सादर करणार असल्याचे सांगितले  यावेळी हुन्नूर चे सरपंच मच्छिंद्र खताळ, उपसरपंच प्रविणकुमार साळे, तुशांत माने, मधु सूर्यवंशी, हसन नदाफ,अदी उपस्थित होते

 सुतार कुटुंबाने पंतनगरी टाईम्स न्यूज पोर्टल चे कौतुक केले

--------------------------

फोटो ओळी:- हुन्नूर ता मंगळवेढा येथील सुतार कुटुंबांच्या समस्याचा अहवाल तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्या आदेशाने लिहून घेताना मंडलाधिकारी नागनाथ जोध, तलाठी एन.एच.मौलवी सरपंच मच्छिंद्र खताळ, उपसरपंच प्रवीण कुमार साळे, मधु सूर्यवंशी आदी उपस्थित होते

Pages