मंगळवेढा / प्रतिनिधी
---------------------------------
हुन्नूर ता. मंगळवेढा येथील दगडू हुसेन सुतार पत्नी रहमतबी, मुलगा आसीम, व उंबरद्दीन, ह्या चौघांचे निधन झाले चार वर्षात होत्याचे नव्हते झाले. घरात फक्त विधवा बायका व लहान लहान मुले आहेत भरीस भर म्हणून मुलगी लैला तिच्याही नवऱ्याचे निधन झाले आता खायचे काय जगायचे कसे असा प्रश्न सुतार कुटुंबा समोर पडला आहे
घरातील कर्ते पुरुषाचे निधन झाल्यावर घरातील महिलांनी संसाराचा गाडा हाकायचा कसा असा विचार करत आहेत महिला अमिनाबी सुतार, इंन्ताज व ननंद लैला, त्यांची मुले कौसर, जरीना, कासिम, लालसाब, ही मुले शिक्षण शिकत आहे, यांना शिक्षणाचा खर्च,व घरातील खर्च या तीन महिलानी कसा करायचा हा प्रश्न पडलेला आहे क्या कुटुंबाला राहायला घर नाही, रेशन मिळत नाही, रेशन कार्ड नाही, विधवा पेंशन मिळत नाही, प्यायला पाणी नाही, शेती आहे पण पी.एम.किसान योजनेचा लाभ मिळत नाही शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ या कुटुंबाला मिळाला नाही या सुतार कुटुंबाला मदतीची व लहान लेकरांना शाळा शिकण्यासाठी मदतीची यांना सर्व शासकीय लाभ मिळावा व सोलापूर जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन संदीप पवार, सामाजिक कार्यकर्ते व माजी जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोलापूर यांनी केली आहे