अवकळीचा तडाखा : मंगळवेढा तालुक्यातील फळबागा, शेतीपिकांचे प्रचंड नुकसान कर्जमाफीच्या आनंदावर पाणी - Pantnagari Times

Breaking News

Sunday, March 1, 2020

अवकळीचा तडाखा : मंगळवेढा तालुक्यातील फळबागा, शेतीपिकांचे प्रचंड नुकसान कर्जमाफीच्या आनंदावर पाणीमंगळवेढा /मदार सय्यद

------------------------------

                 मंगळवेढा तालुक्यातील  शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या आनंदावर पाणी सध्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. अशातच  आज रविवारी सायंकाळी अचानक मंगळवेढा तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या आनंदावर अवकाळी पावसाने पाणी फिरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.मंगळवेढा तालुक्‍यातील पाटकळ नंदेश्वर, भोसे, हुन्नूर, महमदाबाद(हु), लोणार, रेवेवाडी, मानेवाडी, मारोळी, सलगर बुद्रुक, जंगलगी,अनेक भागात आज सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे तालुक्‍यातील ज्वारी, हरभरा, डाळिंब व द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे. ज्वारीच्या अनेक खळी अध्यापही पुर्ण झाल्या नाहीत. गेल्या अवकाळी पावसातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच पुन्हा अवकाळी सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाऱ्यामुळे ज्वारीची काढणी करून रानात पडलेला कडबा उडून गेला. या अवकाळीमुळे पिकाबरोबरच कडब्याचेही मोठे नुकसान होणार आहे. द्राक्ष व डाळींब फळबागांवर या रोगट वातावरण व अवकाळी पावसामुळे रोगराईमध्ये वाढ होणार आहे. उशिरा धरलेल्या डाळिंब बागांना सेटिंग व कळी अवस्थेत असणाऱ्या बागांची फुलगळती व कुजवा या रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे.तरी  मंगळवेढा तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन  नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे

Pages