महमदाबाद येथे ह.भ.प मिस्कर महाराज यांची 36 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी - Pantnagari Times

Breaking News

Sunday, March 8, 2020

महमदाबाद येथे ह.भ.प मिस्कर महाराज यांची 36 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी


मंगळवेढा / मदार सय्यद

-------------------------------- 

       महमदाबाद (हु) ता. मंगळवेढा येथे ह.भ.प. पिराजी मिस्कर महाराज यांची 36 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पुण्यतिथी निमित्त ह.भ.प.राम पाटील महाराज, शाहीर यशवंत खताळ महाराज, यांचे कीर्तन व भजन झाले. हुन्नूर येथील दत्त आश्रम मठाचे मठाधिपती ह.भ.प. परशुराम व्होनमोरे महाराज यांचे काल्याचे किर्तन होऊन ह.भ.प मिस्कर महाराज यांच्या समाधी वर फुले अर्पण करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती सूर्यकांत ढोणे, श्री. संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळचे चेअरमन प्रशांत साळे, दामाजी कारखान्याचे माजी संचालक तम्माकाका चौगुले, गौडाप्पा बिराजदार, सरपंच सुरेश हत्तीकर, आकाराम गोरड, रामा नरळे, निवृत्ती कटरे, चेअरमन सिद्धेश्वर मेटकरी, विठ्ठल जाधव, सुखदेव कटरे, संदीप पवार, विशंभर काटे, विठ्ठल पुजारी, सुरेश घुंबरे पोलीस, सद्दाम नदाफ पोलीस, दगडू नदाफ, बंडू गडदे, तुकाराम नरळे हसन नदाफ, रफिक नदाफ, सुभाष जाधव, सिद्धू कुभार, पांडुरंग होळकर, रंगा नरळे, आदी उपस्थित होते

   कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मार्केट कमिटीचे माजी सभापती काकासाहेब मिस्कर, युवक नेते रामदास मिस्कर, दत्ता मिस्कर, यांनी प्रयत्न केले

Pages