फरार आरोपी अखेर मंगळवेढा पोलिसांकडून जेरबंद,झटापटीत दोन पोलीस कर्मचारी जखमी - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, February 25, 2020

फरार आरोपी अखेर मंगळवेढा पोलिसांकडून जेरबंद,झटापटीत दोन पोलीस कर्मचारी जखमीमंगळवेढा / प्रतिनिधी

         मंगळवेढा पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्याखाली गेली सात वर्षांपासून फरार असलेला आरोपी उमेश जाफर पवार (रा.सिद्धापूर) यास पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या टीमने मोठ्या शिताफीने  जेरबंद केले.दरम्यान पोलिसाच्या तावडीतून सुटका व्हावी यासाठी कमरेला असलेला दांडपट्टा पोलिसांच्या अंगावर उगारून केलेल्या झटापटीत शहानुर फकीर व अनिल दाते हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.

    

पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे हे उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्याशी दैनंदिन कामकाजावर चर्चा करीत बसले असताना त्यांना िश्‍वसनीय सूत्रांकडून फरार आरोपी उमेश जाफर पवार हा त्याच्या दुचाकीवरून मंगळवेढा बाजारात आला आहे. आणि त्याच्याजवळ दांडपट्टा व चाकू अशी हत्यारे आहेत अशी खात्रीशीर गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी पोलिस ठाण्यात हजर असलेले सहायक फौजदार संजय राऊत,मौलाली जमादार,शहानुर फकीर,विकास क्षिरसागर,अनिल दाते यांना तात्काळ कार्यालयात बोलावून घेतले व सदर माहितीप्रमाणे कर्मचाऱ्यांना सूचना देऊन तत्काळ साफळा लावला.


मोटरसायकल आठवडा बाजार कडे जात असताना पोलीस हेडकॉन्स्टेबल शहानुर फकीर यांनी त्यांची मोटरसायकल सदर आरोपींच्या  मोटरसायकल समोर आडवी लावली असता सदर आरोपीने पोलीसाना माझ्या आडवे येऊ नका असे म्हणतच कमरेचा दांडपट्टा काढून फिरूवु लागला त्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल दाते व फकीर यांना हातास दुखापत झाली सोबत कर्मचाऱ्यांनी  दांडपट्ट्यासह आरोपींस ताब्यात घेतले त्या दरम्यान त्याच्या अंगाची झाडाझडती घेतली असता एक चाकू,चाव्यांचा बंडल मिळून आला त्यास ताब्यात घेऊन पचासमक्ष नाव पत्ता विचारला  असता त्याने त्याचे नाव उमेश जाफर पवार(रा  सिद्धापूर )असे सांगितले त्यास उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्यासमोर हजर केले असता वरील गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली असून सदर आरोपीविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील कारवाई सुरू आहे.

हा आरोपी २०१३ पासून फरारी होता . या अटकेमुळे गुन्ह्याचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले

Pages