मंगळवेढा / प्रतिनिधी
--------------------------
हुन्नूर ता. मंगळवेढा येथे शिवप्रेमी ग्रुप यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण ह.भ.प. पवनकुमार व्होनमोरे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच मच्छिंद्र खताळ, गुलाब माने, संतोष शिरसागर भगवान कटरे सर, देवराज पुजारी, विकास पुजारी, नारायण कोरे, संयोजक संदीप पवार सर तानाजी सूर्यवंशी सर वैभव चव्हाण, गुरु घाडगे, प्रवीण सूर्यवंशी, नितीन सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी, अमोल सूर्यवंशी, सर्व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता ह.भ .प. पवन कुमार होनमोरे महाराज यांच्या भजन व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम संदीप पवार सर, व तानाजी सूर्यवंशी सर, व तरुण मंडळ यांच्या सहकार्यातून उत्साहात पार पडला.