आमदार भारत नाना भालके यांच्या वाढदिवसानिमित्त हुन्नूर येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न - Pantnagari Times

Breaking News

Sunday, February 16, 2020

आमदार भारत नाना भालके यांच्या वाढदिवसानिमित्त हुन्नूर येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न


मंगळवेढा / मदार सय्यद

----------------------------------

          हुन्नूर ता. मंगळवेढा येथे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेचे लोकप्रिय आमदार भारत नाना भालके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान हे ओळखून महाविकास आघाडी मंगळवेढा तालुका व जिल्हा परिषद भोसे गट यांच्या संयुक्त विद्यमानाने हुन्नूर येथील हनुमान मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदात्यांच्या रस्ते सुरक्षेसाठी आयोजकांच्या वतीने हेल्मेट भेट व प्रमाणपत्र देण्यात आले मारोळीचे सरपंच बसवराज पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व  श्रीफळ फोडून भव्य रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली,


यावेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे,  रेवेवाडीचे माजी सरपंच जगन्नाथ रेवे, हुन्नूरचे सरपंच मच्छिंद्र खताळ, रेवेवाडीचे सरपंच ब्रह्मदेव रेवे, पडोळकरवाडीचे सरपंच मरगु कोळेकर, शिरनांदगीचे सरपंच गुलाब थोरबोले, माजी उपसरपंच राजाराम पुजारी, हभप  व्होनमोरे महाराज, मानेवाडीचे आनंदा आमुंगे, रावसो कोळेकर, श्रीकांत धायगुडे, सलगर बु. रावसाहेब कोरे, गुलाब माने, मनोहर खडतरे, शहाजी सूर्यवंशी, अनिल व्होनमाने, नितीन सूर्यवंशी, मच्छिंद्र पुजारी, विकास पुजारी, दिलीप खडतरे, रशीद मुलानी, चंदू चौगुले, मुन्ना शिरसागर, व रेवनील ब्लड बँक सांगोलाचे पदाधिकारी व भोसे जिल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Pages