मराठी भाषेचा आदर झाला पाहिजे :- पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे - Pantnagari Times

Breaking News

Thursday, February 27, 2020

मराठी भाषेचा आदर झाला पाहिजे :- पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे


मंगळवेढा / प्रतिनिधी

-----------------------------


 प्रत्येकाने मराठी भाषेचा आदर करीत तीची परंपरा जोपासली पाहिजे.सध्या इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढत आहे. संत ज्ञानेश्‍वर,संत तुकाराम,संत दामाजी,संत चोखामेळा अशा विविध संतांनी अभंग व काव्याच्या माध्यमातून मराठी भाषा जतन करून ठेवली आहे.  प्रत्येक कुटूंबातील सदस्यांनी मातृभाषेत संवाद साधला पाहिजे.मराठी भाषेला खूप मोठी परंपरा असल्याने देशभरात या मातृभाषेची ओळख कायम असल्याचे प्रतिपादन पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी केले.

मंगळवेढा एस. टी.आगारात कवीवर्य वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज  यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा दिन साजरा करतेप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

व्यासपीठावर आगार प्रमुख मधुरा जाधवर,पत्रकार शिवाजी पुजारी,ज्ञानेश्‍वर भगरे,सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक पृथ्वीराज पारसे,मंदार सावंत आदी होते.

आगार प्रमुख मधुरा जाधवर म्हणाल्या,मराठी भाषेचा उगम संस्कृत भाषेतून झाला आहे.एस.टी.महामंडळात सर्व कागदोपत्री व्यवहार  मराठी भाषेत केले जात आहेत.मराठी भाषेचा प्रत्येक नागरिकांनी अभिमान बाळगला पाहिजे. देशामध्ये मराठी भाषेला तिसरे स्थान असून जगामध्ये दहावा नंबर असल्याचे त्यांनी सांगितले.मराठी भाषा ही 13 व्या शतकापासून बोलली जात असल्याने तीची परंपरा भविष्यातही टिकवून ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार पुजारी म्हणाले,इंग्रजी शाळांचे प्रस्त वाढल्याने मराठी बोली भाषेचा वापर कमी होत चालले आहे.

राज्य शासनाने नुकतेच 1 ते 10 वर्गापर्यंत  मराठी भाषा सक्तीची केली आहे.भविष्यात सर्व व्यवहार मातृभाषेत होणे काळाची गरज आहे. मराठी भाषा प्रत्येक नागरिकानी जतन करून हा वारसा पुढच्या पिढीला दिला पहिजे. असे ते म्हणाले.

यावेळी उपस्थित प्रवाशांना मराठी भाषिक दिनानिमित्त एस.टी.महामंडळाकडून पेढयाचे वाटप करून शुभेच्छा दिल्या.सुत्रसंचालन अमोल काळे यांनी केले तर आभार दिलीप खुपसे यांनी मांडले.कार्यक्रमास आगारातील प्रशासकीय कर्मचारी,वाहक,चालक,यांत्रिक कर्मचारी व मोठया संख्येने प्रवासी वर्ग उपस्थित होता.

Pages