मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर पत्रकारदिनी मान्यवरांच्या हस्ते होणार वितरण - Pantnagari Times

Breaking News

Saturday, January 4, 2020

मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर पत्रकारदिनी मान्यवरांच्या हस्ते होणार वितरण    मंगळवेढा / प्रतिनिधी

   --------------------------

           मंगळवेढा येथील शासनमान्य मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून दोन पत्रकारांना आदर्श पत्रकार पुरस्काराचे गौरविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे यांनी दिली.

6 जानेवारी रोजी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात सकाळी ठिक 10 वाजता या पुरस्कारांचे वितरण जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक बबनराव आवताडे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार असून यावेळी सभापती प्रेरणा मासाळ व नगराध्यक्षा अरूणा माळी, संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष फिरोज मुलाणी उपस्थित राहणार आहेत.

यावर्षीचा आदर्श पत्रकार पुरस्कार रड्डे येथील पत्रकार रामा सपताळे व मरवडे येथील पत्रकार शिवाजी केंगार यांना जाहीर करण्यात आला असून शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व गुलाबपुष्प असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
Pages