सांगोला / प्रतिनिधी
ज्ञानाकुर इंग्लिश मिडियम स्कुल, आलेगाव येथे 71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकमाचे अध्यक्ष मा भास्करराव बाबर सह संचालक शिक्षण, मुंबई याच्या हस्ते तसेच आलेगावचे सरपच मा श्रीरंग बाबर व दिलीप पाटील इतर मान्यवराच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला .यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात भास्करराव बाबर यानी आजच्या पिढीला जर चागल्या पध्दतीने घडवायचे असेल तर त्यांनी शिक्षण घेणे गरजेचे आहे तसेच ग्रामीण भागात चालु असलेल्या या स्कुलचे कौतुक केले नंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते स्कुलमध्ये घेण्यात आलेल्या वार्षिक कीडा स्पर्धामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देउन गौरवण्यात आले. या कार्यकमास प्रमुख उपस्थिती म्हणुन स्कुलचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष मा.साहेबराव बाबर, संग्रामसिंह बाबर, तात्यासाहेब बाबर विजय बाबर, कुडलिक काबळे, आलेगाव व इतर मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्कुलचे प्राचार्य बाळासाहेब शिंदे यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना खाउ वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी स्कुलचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले