युटोपियन शुगर्स देश पातळीवरील इंडियनफेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी च्या व्दितीय पुरस्काराने सन्मानित - Pantnagari Times

Breaking News

Sunday, December 29, 2019

युटोपियन शुगर्स देश पातळीवरील इंडियनफेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी च्या व्दितीय पुरस्काराने सन्मानितमंगळवेढा / प्रतीनिधी


मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथील युटोपियन शुगर्स लि. या साखर कारखान्यास देश पातळीवरील दिल्लीस्थित इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या राष्ट्रीय संस्थेने नुकतेच व्दितीय क्रमांकाच्या  पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.दिल्ली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी,नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार,इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी चे चेअरमन आण्णासाहेब एम के पाटील यांच्या शुभ हस्ते व प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक १६/१२/२०१९ रोजी पुरस्कार वितरण सोहळा येथे पार पडला आहे .

     पुरस्कारा बद्दल माहिती देताना कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की,कायम दुष्काळी परिस्थिति असणार्‍या मंगळवेढा तालुक्यात पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख सुधाकरपंत परिचारक व सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली उमेश परिचारक यांनी या भागातील बेरोजगार युवकांना रोजगार निर्मिती व्हावी , या भागामध्ये ऊस उत्पादक तयार व्हावेत व त्यांच्या घामाला योग्य दाम देता यावा तसेच  पांडुरंग सहकारी साखर कारखान्या कडील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागावा या उद्देशाने युटोपियन शुगर्स या अद्यावत तंत्रज्ञान युक्त व शून्य पाणी वापर या तत्वावरील कारखान्याची उभारणी केली. दुष्काळी भागात उभा केलेला हा कारखाना प्रतिकूल पाणी परिस्थिति मुळे कायमच चर्चेत राहिला.

कारखान्याने आत्मसात केलेल्या अद्यावत मशीनरी व तंत्रज्ञानाची राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतराष्ट्रीय पातळीवरही या विषयाची नोंद घेतली गेली आहे.  व्हिएतनाम मंत्रालतील वरिष्ठ अधिकारी व त्या देशातील उद्योजक यांनी अभ्यास दौर्‍या निमित्ताने कारखान्यास भेट देऊन माहिती घेतली.

     अपारंपरिक ऊर्जा संवर्धन व ऊर्जा बचत या क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी केली असल्याने या कारखान्यास देश पातळीवरील हा  व्दितीय पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा या पुरस्काराने युटोपियन शुगर्स च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला असल्याची भावना युटोपियन शुगर्स च्या ऊस उत्पादक व कर्मचारी वर्गा मध्ये असल्याचे मत कार्यकारी संचालक पाटील यांनी व्यक्त केले. 

सोबत :- दिल्लीस्थित इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या राष्ट्रीय संस्थेने नुकताच  युटोपियन शुगर्स लि. या कारखान्यास दिलेल्या पुरस्कारा समवेत कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील व सर्व खातेप्रमुख,अधिकारी,कर्मचारी वर्ग दिसत आहे.Pages