सोलापूर / हसन नदाफ
----------------------------------
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद चंद्रजी पवार साहेब व राज्याचे नेते अजितदादा पवार यांचे आदेशाने सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा लतीफभाई तांबोळी यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जबाबदारी दिल्यावर त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले.
गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी पक्षांमध्ये सर्व समाजाच्या घटकांसोबत तळागाळातील गोरगरीब जनतेच्या विकासासाठी अहोरात्र कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी पक्षाचे काम करणारे व्यक्ती असा त्यांचा परिचय असून आजपर्यंत कोणतेही पदासाठी व फायद्यासाठी काम न करता अल्पसंख्याकांसाठी आहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे लतीफ भाई तांबोळी हेआहेत. राज्याचे नेते अजित दादा पवार, ना.जयंत पाटील, आ.धनंजय मुंडे, सुनील तटकरे, यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मावळ, अहमदनगर ,जालना ,बारामती ,आदी भागामध्ये स्टार प्रचारक म्हणून काम केले. गत विधानसभेच्या वेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे सदस्य भारत नाना भालके व माढा, मोहोळ, येथील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्यात लतीफ भाई तांबोळी यांचे मोलाचे सहकार्य झाले आहे.
आज पर्यंत त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून मंगळवेढा तालुका अध्यक्ष, मतदार संघ अध्यक्ष ,सोलापूर जिल्हा सरचिटणीस, सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष व आता सोलापूर जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष असे अनेक पदे भूषवली आहेत. राष्ट्रवादी चा तळागळातील हाडाचा कार्यकर्ता म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये ओळख आहे.
तरी पक्षश्रेष्ठींनी त्यांना ओबीसी महामंडळावर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.