धाडक सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी संदिपराजे मुटकुळे यांची एकमताने निवड - Pantnagari Times

Breaking News

Sunday, December 1, 2019

धाडक सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी संदिपराजे मुटकुळे यांची एकमताने निवडपंढरपूर / मदार सय्यद

--------------------------------

      आज पंढरपूर येथे पार पडलेल्या धाडस सामाजिक संघटनेच्या बैठकीमध्ये पंढरपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते मा.संदीपराजे मुटकुळे यांची एकमताने निवड करण्यात आली असून त्यांना या निवडीचे पत्र धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यावेळी शरद दादा कोळी यांच्यासोबत धाडस सामाजिक संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सुरज अभंगराव, तसेच छावा क्रांतिवीर सेनेचे प्रसिद्धी संपर्कप्रमुख सागर दादा कदम पंढरपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मधुकर फलटणकर, युवानेते सागर चव्हाण,समाजसेवक सोपान महाराज देशमुख, युवानेते आकाश माने, तसेच सर्व धाडस संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.यावेळी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी ते म्हणाले की मलाही सोलापूर पंढरपूर शहर व तालुक्यात सामाजिक काम करणारा एक तरुण तडफदार असा सामाजिक कार्यकर्ता पाहिजे होता आज तो हिरा मला सापडला आहे व माझी शोधमोहीम इथे संपली आहे. आज मी संदीपराजे मुटकुळे यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून निवड करीत असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून आपल्या मनोगतात सांगितले.यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी संदीपराजे मुटकुळे यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले.या कार्यक्रमांसाठी उपस्थित सर्व  कार्यकर्ते चैतन्य शिंदे, किरण शिंदे, नृसिंह जाधव, अजिंक्य इंदापूरकर, सारंग दावणे, दत्ता जाधव, वैभव माने,बाबासाहेब नेहतराव, भैय्या नंदू पवार,भागवत भोसले, विकास देवमारे, कृष्णा कांबळे, अयक्ष जाधव, शाहू साठे,रोहित अंभगराव, सुनिल लोंढे, किरण सरवदे,कृष्णा साठे, अभिषेक जाधव, सागर कांबळे,महावीर गायकवाड,लखन माळी,कमलेश सर्वगोड,विशाल शिंदे, सागर कवडे,कैन्हाया केकडे, महेश जाधव, रविराज मुटकुळे, शंभूराजे मुटकुळे, वैभव शिंदे, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवार 

उपस्थित होता.

Pages