नंदेश्वर येथे शनिवारी स्‍व.बाळासाहेब बंडगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर - Pantnagari Times

Breaking News

Thursday, November 14, 2019

नंदेश्वर येथे शनिवारी स्‍व.बाळासाहेब बंडगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर

मंगळवेढा / प्रतिनिधी

--------------------------- 


         नंदेश्वरचे दिवंगत नेते कै. बाळासाहेब बंडगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त नंदेश्वर येथील स्व बाळासाहेब बंडगर सांस्कृतिक कला मंडळ व रेवनिल ब्लड बँक सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे उद्घाटन मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा दै. दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे  यांचे हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैलाताई गोडसे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच सदर शिबिर उद्घाटनप्रसंगी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व पत्रकार, विविध पक्षांचे पदाधिकारी, नंदेश्वर तसेच परिसरातील नेते उपस्थित राहणार आहेत.शनिवार दि. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. संयोजकांच्या वतीने रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना हेल्मेट भेट देण्यात येणार आहे.

Pages