मंगळवेढा / प्रतिनिधी
मंगळवेढयातील संतांची ओळख ही राज्यापुरती मर्यादीत नसून संतांमुळे देशात मंगळवेढयाला एक वेगळे स्थान आहे. मंगळवेढयाचा रेंगाळत पडलेला तीर्थक्षेत्र प्रश्न स्थानिक आमदारांना हाताशी धरून चालू पंचवार्षिक योजनेत मार्गी लावला जाईल.पंढरपूर येथे पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय पारायण कार्यक्रमाचे नियोजन असून यासाठी सव्वा लाख वाचक पारायणासाठी बसणार आहेत. अखिल भारतीय वारकरी मंडळ हे गेल्या 15 वर्षापासून वारकर्यांसाठी सामाजिक काम करीत असून वारकर्यांनी आपली मुले याच क्षेत्रात घडवून देशात एक वेगळे स्थान निर्माण करावे असे आवाहन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी केले.
सोलापूर येथे 1 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय वारकरी मेळाव्याचे आयोजन केले असून या पार्श्वभूमीवर मंगळवेढा येथे आयोजित केलेल्या भव्य वारकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे होते.
व्यासपीठावर ह.भ.प.तात्यासाहेब जगताप,ह.भ.प.बजरंग माळी,ह.भ.प.तुकाराम महाराज,भुयार,ह.भ.प.सिध्देश्वर कोळी,ह.भ.प.भागवत गवळी,ह.भ.प.पांडुरंग माने,ह.भ.प.शिवाजी घोडके, ह.भ.प.होनमुरे,ह.भ.प.बाळकृष्ण बळवंतराव ह.भ.प.प्रा.विनायक कलुबर्मे,ह.भ.प.सुदर्शन महाराज,खडकी आदी होते.
ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज म्हणाले,सोलापूरला दि. 1 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय वारकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. वारकरी मंडळाचे सदस्य होण्यासाठी वार्षिक वर्गणीची आकारणी नसल्याने मोठया संख्येने वारकरी मंडळात स्वयंप्रेरणेने सामील व्हावे.वारकरी मंडळ हे वैयक्तिक कुठल्याही राजकिय पुढार्यांना पाठींबा देत नसून ते राजकारण विरहित आहे.वारकरी मंडळाच्या गावागावात व शहरामध्ये शाखा निर्माण करण्याचे काम भविष्यात संपूर्ण राज्यात केले जाणार आहे.वारकरी मंडळींनी आपल्या मुलांना वारकरी घडवून एक वेगळी संस्कृती निर्माण करावी असे ते म्हणाले.
वारकरी मंडळामध्ये महिला व युवांची स्वतंत्र कार्यकारणी करण्यात येणार आहे. दि. 1 डिसेंबर 1920 रोजी पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय पारायणाचा कार्यक्रम होणार असून या साठी देशाच्या कानाकोपर्यातून जवळपास सव्वा लाख वाचक येथे पारायणासाठी बसणार असून तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागेच्या काठावर हा पहिलाच कार्यक्रम होत आहे.मंगळवेढा येथील तीर्थक्षेत्रासाठी व श्री संत चोखामेळा स्मारकासाठी यापुर्वी खा.डॉ.जयसिध्देश्वर महास्वामी व माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना प्रत्यक्ष भेटून याबाबतचे निवेदन दिले आहे. या पुढेही अखिल भारतीय वारकरी मंडळ शासनदरबारी करेल असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विठ्ठल-रुक्मिणी,श्री दामाजी पंत यांच्या मुर्तीचे व विना पुजन करण्यात आले.
यावेळी सुरुवातीला नुकतेच दिवे घाटात झालेल्या दुर्घटनेत वैकुंठवासी झालेेले ह.भ.प.सोपान महाराज नामदास व अन्य एक वारकरी तसेच 26/11 च्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानोबा फुगारे यांनी केले.यावेळी बंडोपंत कुलकर्णी,बळीराम जांभळे,जोतीराम चांगभले,मोहन शेळके,संजय पवार,भाऊसाहेब बेलेराव,कुमार गायकवाड,नागनाथ गायकवाड,निवृत्ती पवार,आदर्श इंगळे,गुरुसिध्द गायकवाड,मल्लिकार्जून राजमाने,गोपाळ कोकरे,ज्ञानेश्वर भगरे,रमेश माने,बाळासाहेब जामदार,तानाजी चोपडे,अशोक घाडगे,अरविंद माने,भारत ढोणे,जयराज शेंबडे,शेखर सुतार,मिया आतार,दिनानाथ नांद्रेकर,मोहन जुंदळे,परमेश्वर पाटील,आप्पाराव मांजरे,धनाजी देवकर,दगडू ठोंबरे,स्वप्नील फुगारे,लक्ष्मण कोंडुभैरी, मारुती भगत सतीश दत्तू,आनंदाव जावळे,सतीश पाटील, भिमराव पाटील यांच्यासह महिला वारकरी व पुरुष वारकरी मोठया प्रमामाणात उपस्थित होते. सुत्रसंचालन विनायक कलुबर्मे,तर आभार निलेश गुजरे यांनी मांडले.