युटोपियन शुगर्स चे मोळी पूजन संपन्न - Pantnagari Times

Breaking News

Saturday, November 23, 2019

युटोपियन शुगर्स चे मोळी पूजन संपन्नमंगळवेढा / मदार सय्यद

---------------------------------


                युटोपियन शुगर्स लि. कचरेवाडी या कारखान्याने गळीत हंगाम २०१९-२० या आपल्या सहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या शुभहस्ते आज शनिवार दि. २३/११/२०१९ रोजी गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. सुरूवातीस  युटोपियन शुगर्स चे चिफ अकौंटंट श्री. मुकेश रोडगे व त्यांच्या सौभाग्यवती अश्विनी रोडगे या उभयतांच्या शुभहस्ते सत्यनारायण महापूजा व गव्हाणी चे पूजन करण्यात आले या प्रसंगी कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, कचरेवाडी चे सरपंच हणमंत कोळेकर, माजी सरपंच शिवाजीराव शिंदे,नागनाथ काळुंगे, बाळदादा काळुंगे,भीमा स.सा.का.मा.संचालक राजुबापू गावडे,सुस्ते येथील सरपंच आगतराव रणदिवे,पोहोरगाव येथील बाबासाहेब पाटील,खरसोळी मा.सरपंच दत्ता कांबळे, दुर्योधन दुधाळ,सुभाष मदने,श्रीमंत कदम,प्रकाश पाटील,प्रकाश कदम,औदुंबर पाटील,मा.मार्केट कमिटी संचालक खंडेराव रणदिवे,प्रकाश मोहोळकर, यांचे समवेत कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.

     यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की, युटोपियन शुगर्स चा हा सहावा गळीत हंगाम असून या वर्षी पुरेसा व योग्य पाऊस न झाल्याने  दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे ऊस लागवडी चे क्षेत्र कमी होऊन गेल्या वर्षी च्या तुलनेत यंदा ऊसाची उपलब्धता कमी आहे परंतु ऊस उत्पादकांचा विश्वास व कार्यक्षम व्यवस्थापनाच्या जोरावर युटोपियनच्या शेती विभागाकडे  अपेक्षित ऊसाची नोंद झाली आहे,गळीत हंगाम २०१९-२० मध्ये कारखाना चार महीने सुरू राहील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

     पुढे बोलताना परिचारक म्हणाले की,मागील सर्वच गळीत हंगामात युटोपियन ने एफ.आर.पी.पेक्षा जास्तीचा दर देण्याची परंपरा कायम राखत एक वेगळा आदर्श निर्माण केला असून,पुढील काळामध्येही ही परंपरा कायम राखणार आहोत.या भागातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी मागील सर्व ही हंगामामध्ये युटोपियनला ऊस गाळपास देऊन सहकार्य केले होते,व या पुढील काळातही आपला सर्व ऊस युटोपियन ला गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन ही परिचारक यांनी केले. यावेळी त्यांनी ऊस उत्पादक व कर्मचारी या सर्वांना गळीत हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.      

            यावेळी बोलताना कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की, कारखान्याने गळीत हंगाम २०१९-२० साठी तांत्रिक तयारी पूर्ण केली असून कारखान्याचा उत्पादन विभाग,यांत्रिक विभाग,हा गाळप हंगामास तयार असून अपेक्षित उद्दीष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. चालू हंगाम हा आव्हानात्मक असून त्यासाठी व्यवस्थापनाने पूर्ण तयारी केली आहे कारखाना आधुनिक तंत्रज्ञाना च्या जोरावर कारखाना गाळप उद्दीष्ट निश्चित पूर्ण करेल. तसेच  सध्या दुष्काळी परिस्थिति असल्याने कारखानदारी अडचणीत आहे त्यामुळे कारखाना काटकसरीने चालविण्यासाठी युटोपियन प्रयत्नशील आहे.कारखाना ऊस उत्पादकांच्या हिताचा विचार करून ऊस उत्पादकांचे उत्पन्न व उत्पादकता वाढावी या करिता ऊस बेणे,खाते,ठिबक सिंचन,व प्रती एकरी १०० टन ऊस उत्पादना करिता वेळोवेळी तज्ञांच्या मार्फत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच कारखान्याचा  नव्याने उभारण्यात आलेला आसवनी प्रकल्प योग्य रीतीने चालू असून त्याचा फायदा ऊस उत्पादकांना भविष्यात जास्तीचा दर देण्यासाठी होणार आहे. सूत्रसंचालन व आभार लक्ष्मण पांढरे यांनी केले.

फोटो ओळी: युटोपियन शुगर्स लि. पंत नगर कचरेवाडी या कारखान्याने गळीत हंगाम २०१९-२० या आपल्या सहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी मोळी पूजन करताना कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक,कचरेवाडी चे सरपंच हणमंत कोळेकर, माजी सरपंच शिवाजीराव शिंदे,नागनाथ काळुंगे भीमा स.सा.का.मा.संचालक राजुबापू गावडे,सुस्ते येथील सरपंच आगतराव रणदिवे,पोहोरगाव येथील बाबासाहेब पाटील,खरसोळी मा.सरपंच दत्ता कांबळे,बाळदादा काळुंगे,दुर्योधन दुधाळ,सुभाष मदने,श्रीमंत कदम,प्रकाश पाटील,प्रकाश कदम,औदुंबर पाटील,मा.मार्केट कमिटी संचालक खंडेराव रणदिवे,प्रकाश मोहोळकर,कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, सर्व अधिकारी,खाते-प्रमुख,व कर्मचारी वर्ग आदि दिसत आहेत .

Pages