मंगळवेढा / प्रतिनिधी
-------------------------------
जवळा तालुका सांगोला येथील विलास केदार माघाडे यांचे जवळा येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले मृत्युसमयी ते 51 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात एक मुलगा पत्नी असा परिवार आहे .हुन्नूरचे ग्रामसेवक सिकंदर इनामदार व जवळा येथील इनामदार यांच्या साँ मिल चे मॅनेजर म्हणून गेल्या 19 वर्षांपासून काम पाहत होते. इनामदार व मागाडे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
विधान परिषदेचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी मागाडे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले .यावेळी अनिल सुतार ,पप्पू आलकुंडे, सचिन शंकर ,आदी उपस्थित होते यावेळी मागाडे कुटुंबातील समाज बांधव उपस्थित होते.
मागासवर्गीय समाजामध्ये एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून विलास मागाडे होते. त्यांच्या निधनाने जवळा परिसरामध्ये लाकड व्यापारामधून हळहळ व्यक्त होत आहे.