मंगळवेढा तालुक्यातील रब्बी हंगाम आणि फळ बागा शेतक-यांना शासनाने तातडीची मदत व पंचनामे करावेत - Pantnagari Times

Breaking News

Monday, November 4, 2019

मंगळवेढा तालुक्यातील रब्बी हंगाम आणि फळ बागा शेतक-यांना शासनाने तातडीची मदत व पंचनामे करावेतपंढरपूर / प्रतिनिधी

----------------------------

मंगळवेढा तालुक्यामधील रब्बी हंगाम आणि फळ बागायतदार शेतकरी संकटात सापडले असून यावर्षी परतीच्या पावसाने मंगळवेढा शिवरातील पेरण्यापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे रब्बी हंगाम आणि फळ बागायतदार शेतक-यांना मोठ्याप्रमाणात तोटा सहन करावा लागला आहे.मंगळवेढा तालुक्यातील ७०% पेरण्यांना वाफसा मिळत नसल्याने आणि पेरण्या थांबल्याने यावर्षी चार टंचाई निर्माण होणार असल्याचे शेतकरी वर्गामधून बोले जात आहे.रब्बी हंगामाच्य पेरणीसाठी हस्त व चित्रा ही दोन नक्षत्र म्हत्वाची होती.हस्त नक्षत्रात मंगळवेढा भागातील शेतकरी पेरण्यासाठी करण्यावर भर देतो.परंतु कोरडवाहू क्षेत्रावर हस्त नक्षत्रामध्ये पडणा-या पावसाळ्यात पेरणी लाभ ठरता.मंगळवेढा तालुका ज्वारीसाठी जीआय मानांकन म्हणून ओळखला जातो. साधारपणे ऑगस्ट महिन्यात मंगळवेढा तालुक्यातील शिवरात ज्वारीची पेरणीला सुरूवात केली जाते.गौरी गणपतीनंतर सात्याने  पावसाने जोर धरल्याने मंगळवेढा भागातील शेतक-यांना पेरणी करतात आली नाही .तसेच मंगळवेढा काही भागातील फळ बागा आणि डाळींबीच्या बागा परतीच्या पावसाने वाया गेल्यामुळे बागायतदार शेतकरी अडचणी सापडल आहे म्हणून मंगळवेढायात रब्बी हंगाम आणि फळ बागायतदार शेतकरी संकटात सापडला आहे त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने आवश्यक मदत देण्यात यावी. अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Pages