मंगळवेढा / मदार सय्यद
--------------------------------
महमदाबाद(हु) ता. मंगळवेढा येथील आपद्ग्रस्त घुबंरे कुटुंबास श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळ हुन्नूर यांचे वतीने 51 हजार रुपयांचा मदतनिधी . अध्यक्ष प्रशांत साळे यांच्या हस्ते देण्यात आला बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सोपान घुबंरे व त्यांच्या कुटुंबीयांवर लक्ष्मणघुबंरे याने पेट्रोल टाकून घुबंरे कुटुंबास जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता या घटनेत सोपान यांचा मुलगा शरद याचा दुर्दैवी अंत झाला शरद हा माध्यमिक आश्रम शाळा हुन्नुर या प्रशालेतील इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता आज दिनांक नऊ नो.व्हेंबर रोजी दिवाळी सुट्टी संपून द्वितीय सतराचा शाळेचा पहिला दिवस होता आज सकाळी माध्यमिक आश्रम शाळा प्रशालेच्या वतीने दिवंगत शरद यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली श्रद्धांजली नंतर श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत साळे व मुख्याध्यापक एकनाथ होळकर अनुराधा स्वामी तसेच सर्व शिक्षकांनी एकत्रित बैठक घेऊन अपघातग्रस्त घुमरे कुटुंबास सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करण्याचा प्रस्ताव मांडले नंतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे अध्यक्ष आदिंनी मिळून तातडीने 51 हजार रुपयांची मदत गोळा केली श्रद्धांजली नंतर शाळेला सुट्टी देऊन संस्थाध्यक्ष व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोलापूर येथील शासकीय इस्पितळात जाऊन जखमी सोपान घुमरे व त्यांच्या पत्नी सोनाबाई यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर देत सोपान यांचे चिरंजीव संतोष घुबंरे याच्याकडे 51 हजार रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून सुपूर्द केली यावेळी संस्थाध्यक्ष प्रशांत साळे मुख्याध्यापक एकनाथ होळकर विलास डोके विलास आवताडे शिवाजी चव्हाण गुरुदेव स्वामी शिवाजी काशीद बजरंग चौगुले श्रीमंत गोरड आप्पासाहेब कटारे जगन्नाथ काटकर महादेव घुमरे संदीप पवार राजाराम पाटील महेश कटरे जाधव सुरेश तेली आदीसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
-: चौकट :-
परमेश्वराने कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ आणू नये सोपान घुबंरे यांचे कुटुंब या घटनेने पूर्णपणे हादरून गेले असून त्यांची आर्थिक परिस्थिती ही पूर्णपणे खालावलेली आहे ऊस तोडी करणारे हे कुटुंब आहे एक सामाजिक कर्तव्य . व बांधिलकी म्हणून संस्थेच्या वतीने आम्ही ही मदत केली असून समाजातील दानशूर व्यक्तीने या कुटुंबास मदत करणे गरजेचे आहे ज्या व्यक्तींना मदत करावयाची आहेअशा व्यक्ती व सामाजिक संस्थांनी श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळ हुन्नूर या संस्थेचे मंगळवेढा येथील स्टेट बँकेत 11 55 85 65 54 54 या क्रमांकाचे खाते असून सदर खाते 80g खाली खाली असलेने आपण केलेली रक्कम करमुक्त असणार असल्याने व ही मदत अत्यंत अडचणीत असलेल्या घुमरे कुटुंबास मोलाचे होणार असल्याने फुल ना फुलाची पाकळी म्हणून या कुटुंबास आधार म्हणून सदर खात्यावर मदत पाठवावी असे आव्हान संस्था अध्यक्ष प्रशांत साळे यांनी यावेळी केले