बोहाळीचे श्री अप्पासाहेब जाधव यांची परिचारक गटात घरवापसी - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, October 16, 2019

बोहाळीचे श्री अप्पासाहेब जाधव यांची परिचारक गटात घरवापसीपंढरपूर / प्रतिनिधी

---------------------------                बोहाळी येथील श्री आप्पासाहेब जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज श्री सुधाकरपंत परिचारक यांच्या उपस्थितीत परिचारक गटात प्रवेश केला त्यांच्यासमवेत त्यांचे सहकारीही यावेळी उपस्थित होते

माननीय सुधाकरपंत परिचारक यांना पूर्वीपासूनच बोहाळी गावची साथ लाभली होती परंतु मध्यंतरीच्या काळात काही राजकीय घडामोडी झाल्या त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील बऱ्याच राजकीय पुढाऱ्यांनी

परिचारक गटापासून फारकत घेतली होती त्यामध्ये आप्पासाहेब जाधव हेही सामील झाले होते आप्पासाहेब जाधव मागील दहा वर्षापासून श्री भारत भालके यांच्या गटाचे काम करत होते परंतु त्यांना त्या गटांमध्ये त्यांचे मन रमत नसल्याकारणाने  व भारत भालके यांच्या गटात सध्या राजकीय अनास्था निर्माण झाल्याने आज परत अप्पासाहेब जाधव यांनी पुन्हा श्री सुधाकर पंत परिचारक यांचे नेतृत्व मान्य केले

श्री आप्पासाहेब जाधव यांचे वडील बाबुराव जाधव यांची परिचारक यांना पूर्वीपासूनच  राजकीय मदत  मिळाली आहे त्याप्रमाणेच परिचारक गटांनीही बोहाळी चे जाधव यांना श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक व व्हाईस चेअरमन बहाल केले होते परंतु मध्यंतरीच्या काळात दुरावा निर्माण झाला होता परंतु

आज बोहाळी येथे पार पडलेल्या सुधाकरपंत परिचारक यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या सभेत आप्पासाहेब जाधव उपस्थित होते त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये आपण परिचारक गटात प्रवेश करीत असून त्यांना बोहाळी गावातून मताधिक्‍य देणार असल्याचे मनोगत व्यक्त केले  तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचार करण्याचे व पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून उभा राहिलेले श्री सुधाकरपंत परिचारक यांना निवडून देण्याचे आवाहन केले

Pages