मी कच्च्या गुरुचा चेला नाही तर शरद पवारांचा पठ्ठया आमदार भारत भालके यांनी शिवतीर्थावर ठोकला शड्डू - Pantnagari Times

Breaking News

Thursday, October 24, 2019

मी कच्च्या गुरुचा चेला नाही तर शरद पवारांचा पठ्ठया आमदार भारत भालके यांनी शिवतीर्थावर ठोकला शड्डूपंढरपूर / प्रतिनिधी

----------------------------


             मी कच्च्या गुरुचा चेला नाही तर कै.औदुंबर अण्णा पाटील, यशवंतभाऊ पाटील, राजाभाऊ पाटील, व वसंतराव काळे, यांच्या तालमीत तयार झालो आहे शरद पवारांचा पट्ट्या आज विजयी झाला असल्याचे आमदार भारत भालके यांनी सांगितले.

 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर शिवतीर्थावर घेतलेल्या विजय सभेत ते बोलत होते यावेळी भगीरथ भालके, नगरसेवक महादेव भालेराव, महादेव धोत्रे, सुमित शिंदे, राजेश उघाडे, आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आमदार  भारत नाना भालके यांची पंढरपूर शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक  काढण्यात आली.

विजय सभेत बोलताना आमदार भारत नाना भालके म्हणाले की मला सर्वसामान्य जनतेने तीन वेळा निवडून देण्याची जबाबदारी पार पाडली आहे आता त्यांची अविरत सेवा करीत राहणार असण्याची सांगितले.

Pages