पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुलीपुढे स्वयंपाक करणाय्रा महिलाना उज्वला योजनेतून धुरमुक्त केले :- सुरभी हांडे - Pantnagari Times

Breaking News

Saturday, October 19, 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुलीपुढे स्वयंपाक करणाय्रा महिलाना उज्वला योजनेतून धुरमुक्त केले :- सुरभी हांडे



 मंगळवेढा / प्रतिनिधी

----------------------------

          

          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुलीपुढे स्वयंपाक करणाय्रा महिलाना  उज्वला योजनेतून धुरमुक्त केले सुरभी हांडे.या मतदारसंघातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी सुधाकरपंत परिचारक यांना साथ देत विजयी करण्याचे आवाहन मराठी सिने अभिनेत्री सुरभी हांडे यांनी केले आहे.

        भारतीय जनता पार्टी, शिवसेना रिपाई महासंग्राम रयत क्रांती मित्र पक्षाचे उमेदवार  सुधाकर परिचारक यांच्या  प्रचारार्थ  आयोजित  महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सीमाताई परिचारक,महिला बालकल्याण सभापती रजनी देशमुख,शीतल बुरकुल,ज्योती चव्हाण,अंजली मोरे,अश्विनी शहा,नगरसेविका निर्मला माने,पंचायत समिती सदस्य राजश्री नागणे,रेणुका साळुंखे,शुभांगी सूर्यवंशी,सविता स्वामी रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष  राहुल शहा, चरनूकाका पाटील, दामोदर देशमुख,नगरसेवक अजित जगताप,शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,शिवानंद पाटील,माजी नगरसेवक महादेव जिरगे,चंद्रशेखर कोंडुभैरी,मुजफ्फर काजी,सरपंच रामेश्वर मासाळ,खन्ना माळी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री हांडे  म्हणाल्या की,भाजप पक्षाचे कार्य व त्यांच्या कामाची पद्दत विकासाच्या दृष्टीने चालत आहे.गरिबांन व महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या योजना चालू करून त्याचा लाभ त्यांना मिळवून दिला.महिला बचत गटाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज वाटप करून महिलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा केले.महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊन केंद्र शासनाच्या वतीने आयुष्यमान भारत योजना सुरू केली.लहान-मोठ्या उद्योगाना मुद्रा योजनेतून आर्थिक पाठबळ दिले.

Pages