युटोपियन शुगर्स कामगार कल्याण व महिला मंडळ यांचे वतीने मंगळवेढा येथे दांडिया व गरबा स्पर्धेचे आयोजन - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, October 8, 2019

युटोपियन शुगर्स कामगार कल्याण व महिला मंडळ यांचे वतीने मंगळवेढा येथे दांडिया व गरबा स्पर्धेचे आयोजन मंगळवेढा / प्रतिनिधी

-------------------------------               नवरात्र महोत्सवानिमित्त युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील कामगार कल्याण मंडळ व महिला मंडळ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे या ही वर्षी शनिवार दि. १२/१०/ २०१९ रोजी भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर च्या स्पर्धा श्रीराम मंगल कार्यालय मंगळवेढा येथे सायंकाळी ४.०० वा. होणार आहेत.या स्पर्धांचे वैशिष्ट म्हणजे स्पर्धकांना प्रोत्साहन देणे करीता लग्न मुबारक,रे राया,F.U.फेम सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे ,झाला बोभाटा, हिरव कुंकू फेम सिने अभिनेत्री तेजा देवकर ,एक थ्रीलर नाईट, लव्ह बेटींग फेम सिने अभिनेता केतन पेंडसे हे प्रत्यक्ष दांडिया व गरबा नृत्य मध्ये सहभागी होणार आहेत.


स्पर्धेचे उद्घाटन व प्रमुख पाहुणे म्हणून सौ.सिमाताई परिचारक,सौ.विनयाताई परिचारक,यांची उपस्थिती लाभणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ विद्या दीपक देसाई या भूषवणार आहेत.नवरात्र महोत्सवाच्या जल्लोषमयी वातावरणात रंग भरण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन लेसर लाईट,एलईडी  सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युटोपियन शुगर्स कामगार कल्याण व महिला मंडळ यांचे वतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शना खाली सर्वतोपरी प्रयत्न केले जात  आहेत. या स्पर्धे करिता महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढावा या करिता प्रवेश विनामूल्य ठेवला आहे. सदर च्या स्पर्धे करिता प्रथम बक्षीस रु. ११०००/- (शिर्के मॅटरर्णिटी होम डॉक्टर शरद शिर्के )द्वितीय बक्षीस रु.७०००/- शिर्के मॅटरर्णिटी होम डॉक्टर शरद शिर्के ) तृतीय बक्षीस रु.५०००/- मे. गजानन रत्नपारखी (जयदीप रत्नपारखी) तसेच उत्तेजनार्थ ५ बक्षीस ठेवण्यात आलेले  आहेत.


           या स्पर्धेत अधिकाधिक महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन युटोपियन शुगर्स कामगार कल्याण व महिला मंडळ यांचे वतीने उपाध्यक्षा सौ सुवर्णा गणपत फाळके यांनी केले आहे.


आधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क :-


१)     डॉ. प्रीती शिर्के                  मो. क्रमांक ९४२०४ ९११०३


२)     सौ मोना जयदीप रत्नपारखी       मो. क्रमांक ९८६०७ २४७२६


३)     सौ विद्या बालाजी शिंदे           मो. क्रमांक ८३२९३ १९६२२


४)     सौ भारती नागेश धनवे           मो. क्रमांक ८६६८६ ३२१७७

Pages