स्वतः साठी पहिल्यांदाच जनतेच्या विश्वासावर विधानसभेत जाण्यासाठी मत मागायला आलो आहे : प्रा.शिवाजीराव काळुंगे - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, October 15, 2019

स्वतः साठी पहिल्यांदाच जनतेच्या विश्वासावर विधानसभेत जाण्यासाठी मत मागायला आलो आहे : प्रा.शिवाजीराव काळुंगे


 मंगळवेढा / प्रतिनिधी

--------------------------------              आजवर जनतेला केंद्रबिंदु मानून धनश्री परिवाराच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावर स्वतः साठी पहिल्यांदाच जनतेच्या विश्वासावर विधानसभेत जाण्यासाठी मत मागायला आलो आहे असे प्रतिपादन प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.


 "मरवडे येथुन प्रा.काळुंगे यांना एक लाख एक हजार रुपयांची देणगी"


 "पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रा. शिवाजीराव काळुंगे यांना निवडणुकीसाठी मरवडे येथील नामदेव घुले, रजाकभाई मुजावर, राजू मस्के, जगन्नाथ मासाळ, हणमंत पवार, गोरख गणपाटील, परमेश्वर घुले यांनी एक लाख एक हजार रुपयांची देणगी दिली."


विधानसभा निवडणूकीनिमित्त मंगळवेढा तालुक्यातील माळेवाडी, हुलजंती, पौट, येळगी, सोड्डी, शिवणगी, आसबेवाडी, सलगर खु, लवंगी, सलगर बु, मरवडे आदी गावभेटीचा दौरा मंगळवार दि.15 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे उमेदवार प्रा. काळुंगे बोलत होते.

पुढे प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले, जनता ही सार्वभौमत्व आहे त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीच अखेरच्या श्वासापर्यंत काम करत राहणार आहे. गेली 52 वर्षे काँग्रेसचा एकनिष्ठ म्हणुन काम करीत आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 वर्षे मंगळवेढा तालुक्याचा काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. या काळात सुशीलकुमार शिंदे यांच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यात अनेक विकास कामे केली. यामध्ये सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा अरळी बंधारा मंजुरी साठी तसेच पौट तलावासाठी सही केली. त्यामधून अरळी बंधारा आज पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्याभागाचे आज नंदनवन आहे. पौट तलाव मात्र काही स्थानिक अडचणीमुळे पौट तलाव पूर्ण झाला नाही. मंगळवेढा येथे दामाजी चौकात नवीन पोस्ट ऑफिस इमारत, साठे नगर मधील दूरदर्शन केंद्र त्याबरोबर ग्रामीण भागात सभागृह बांधणे, अनेक माध्यमिक शाळेच्या इमारती बांधण्यासाठी मदत, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून अनेक रस्ते मंजूर करून घेतले आहे.

1993 सालापासून स्व.क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांचे नेतृत्वाखाली आ.भाई गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा खोऱ्यातील 13 दुष्काळी तालुक्याची पाणी संघर्ष चळवळ उभी राहिली. तिचा गेली 27 वर्ष मंगळवेढा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. या पाणी संघर्ष चळवळीच्या रेट्यामुळे म्हैसाळचे पाणी हुन्नूरच्या ओढ्यात ट्रायल स्वरुपात आले. ते नियमित पाणी यावे, मंगळवेढा तालुक्यातील उजनीच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा असून तालुक्यातील सुमारे ९० हजार एकराकरिता साडेसहा टी एम सी पाणी मंजूर असतानाही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचले नाही. त्यामुळे उजनीची अपूर्ण कामे पूर्ण करणे, कॅनॉलसाठी अधिग्रहण केलेल्या जमीनधारकांना त्या क्षेत्राचा अद्याप न मिळालेला मोबदला मिळवून देऊन कामे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे, ३५ गावासाठी असणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस निधी मिळवून योजना पूर्ण करणे, भीमा व माण नदीला कॅनॉलचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणे, दुष्काळाचे कायमस्वरूपी निर्मूलन करणे यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर असलेली निष्ठा त्याचबरोबर आपला काँग्रेस हा शेवटचा पक्ष मानीत आपण काँग्रेसशी एकनिष्ठ राहिल्याने आपल्याला विधानसभा निवडणुकीचे तिकीट पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेले आहे. मात्र विरोधक किळसवाणी अफवा पसरवून मतदारात संभ्रम निर्माण करीत आहेत.

यावर विश्वास न ठेवता आपण सर्व मतदारांनी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावे. कारण तुमच्या विश्वासावर विधानसभेत जाण्यासाठी मत मागायला आलो आहे. आपण संधी दिल्यास पुढील पाच वर्षे आपल्याशी प्रामाणिक राहून काम करीत राहीन असे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड, विठ्ठल काळुंगे,

राजाराम सावंत, रजाकभाई मुजावर, वसंत गरंडे , सलगर खुर्दचे सरपंच विठ्ठल शामराव सरगर, अक्षय टोमके, परमेश्‍वर घुले, शिवाजी काळे आदीनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी यादाप्पा माळी, महादेव कोरे, दत्तात्रय गायकवाड, संजय सुर्यवंशी, मळसिध्द गावडे, जकराया सोमुत्ते, रेवाप्पा पडवळे, सुखदेव डोळळे, आप्पासाहेब भोरकडे, नागेश कोळी, आप्पासाहेब चव्हाण, कृष्णा निकम, लवंगीचे सरपंच ईश्वर डोळळे, रजाक पाटील, गफूर पाटील, जोतीराम घाटगे, बाळू खडतरे, श्रीशैल धायगोंडे, श्रीकांत धायगोंडे, राम तेली, राम पुकळे, सदाशिव गवळी, रतीलाल आसबे, मारूती भुसे, संतोष पाटील, अशोक गडगे, यशवंत बेलदार, सीताराम पाटील, समाधान बिराजदार, ज्ञानेश्वर सपकाळ, नामदेव घुले, रतीलाल केंगार, जगन्नाथ बोराडे, सिद्धेश्वर सुर्यवंशी, सुनील गवळी, संतोष माने, प्रकाश सुर्यवंशी, सुखदेव जगताप, संतोष पाटील, बंडू शिंदे, विलास राठोड, विठ्ठल सुर्यवंशी, महादेव शिवशरण यांचेसह विविध गावातील संस्थेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

------------------------------

बुधवार दि.१६ ऑक्टोबर रोजी निवडणूकीच्या प्रचारार्थ नंदुर,डोणज,लमाणतांडा,कर्जाळ, कात्राळ,कागष्ट,डिकसळ,रहाटेवाडी,तामदर्डी, तांडोर,सिद्धापूर,अरळी,बोराळे या ठिकाणी सभा आयोजित केल्या आहेत.Pages