पंढरपूर ब्रेकिंग संतोष नेहतराव कुटुंबियांचा भाजपामध्ये प्रवेश विधानसभा निवडणुकीत परिचारक यांना पाठिंबा - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, October 16, 2019

पंढरपूर ब्रेकिंग संतोष नेहतराव कुटुंबियांचा भाजपामध्ये प्रवेश विधानसभा निवडणुकीत परिचारक यांना पाठिंबा
पंढरपूर / प्रतिनिधी

------------------------- 


                पंढरपूर येथील नेहतराव कुटुंबीयाने काल दिनांक 16 रोजी 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील भाजप शिवसेना व मित्र पक्षाचे उमेदवार श्रीयुत सुधाकरपंत परिचारक यांना पाठिंबा जाहीर करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.संतोष नेहतराव हे पंढरपूर येथील कोळी समाजाचे नेते असून एकेकाळी परिचारक गटाचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून परिचित होते परिचारक गटानेही त्यांच्या मातोश्री सौ सुमन ताई नेहतराव यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले होते सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देतेवेळी अनेक घडामोडी झाल्या होत्या. मात्र,सध्याचे महायुती चे उमेदवार माननीय श्री सुधाकरपंत परिचारक यांनी नेहतराव यांना अध्यक्षपद देण्यासाठी चांगलीच कंबर कसली होती.जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्या कामीही परिचारक यांनीच प्रयत्न केले होते कोळी समाजामध्ये नेहतराव कुटुंबीयांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे परिचारक यांनीही नेहतराव यांचे बंधू सुरेश नेहतराव बाळासाहेब नेहतराव यांनाही पंढरपूर नगर परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिली होती. मात्र 2009 नंतर च्या घडामोडी मध्ये संतोष नेहतराव हे परिचारक गटापासून बाजूला गेले होते आता पुन्हा ते परिचारक यांच्या विजयासाठी सरसावले असून कोणत्याही परिस्थितीमध्ये परिचारक यांना निवडून आणण्यासाठी  ते प्रयत्न करणार आहेत.नेहतराव यांच्या प्रवेशाने पंढरपूर शहरांमध्ये परिचारक यांचे पारडे जड झाल्याचे दिसून येत असून, पंढरपूर शहरातून मोठे मताधिक्य मिळणार हे जवळपास उघड झाले आहे .काल पंढरपूर येथे नेहतराव कुटुंबीयांचे कुटुंबप्रमुख वसंतराव नेहतराव, बाळासाहेब नेहतराव ,सुरेश नेहतराव,व संतोष नेहतराव या सर्वांनी परिचारक यांना पाठिंबा देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने पंढरपूर मध्ये परिचारक गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

Pages