मंगळवेढा / मदार सय्यद
-----------------------------
दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी दिवाळी अंक काढले जातात. याच अंकांमुळे साहित्यिकांचे साहित्य घराघरात पोहचत असल्याचे प्रतिपादन संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी केले.
स्वाभिमानी छावा दिवाळी अंकाचे प्रकाशन रविवारी समाधान आवताडे यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
आवताडे म्हणाले, मंगळवेढयाला साहित्याचा मोठा वारसा लाभलेला आहे. अनेक नवनवीन साहित्यिक निर्माण होत आहेत. या साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम स्वाभिमानी छावाने केले असून साहित्य चळवळीच्या वाढीतही स्वाभिमानी छावाचे योगदान असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, स्वाभिमानी छावाचे संपादक ज्ञानेश्वर भगरे, संत दामाजी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र सुरवसे, पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे, माजी अध्यक्ष बाळासाहेब नागणे, महेश वठारे, विजय भगरे, प्रतिक भगरे, सिताराम खराडे,हरिभाऊ ताम्हणकर, लहू ढगे, सिद्धेश्वर पाटील आदि उपस्थित होते.
सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिगंबर यादव यांनी केले.