पंढरपूरात बेघरांसाठी निवास ही संकल्पना राबविणार आ. प्रशांत परिचारक - Pantnagari Times

Breaking News

Friday, October 18, 2019

पंढरपूरात बेघरांसाठी निवास ही संकल्पना राबविणार आ. प्रशांत परिचारकपंढरपूर / प्रतिनिधी

------------------------


                पंढरपूर-पंढरपूर शहराचा विकास करीत असताना वेगवेगळ्या योजना आणि निधी पंढरपूर साठी मिळाला आहे. मध्ये तीर्थक्षेत्र असल्यामुळे बेघरांना देखील इथे चांगल्या पद्धतीने राहता यावे. यासाठीचा प्रयत्न देखील आपल्या नगरपालिकेच्यावतीने करून बेघरांसाठी निवास ही संकल्पना राबवीत असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.

महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारार्थ डॉक्टर्स, इंजिनिअर्स, प्राध्यापक, शिक्षक अशा वर्गाचा प्रज्ञावंत संवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. प्रसंगी डॉक्टर व्ही.आर. व्होरा, डॉ.बी. पी. रोंगेसर , नागेश शिंगण आदी उपस्थित होते. प्रसंगी सुधाकरपंत परिचारक यांनी देखील कमळ चिन्ह समोरील बटन दाबून आपणास विधानसभेत पाठवावे, असे आवाहन केले.

प्रसंगी पुढे बोलताना आ .परिचारक म्हणाले ,  पंढरपूर शहर याठिकाणी 100% ड्रेनेजची व्यवस्था पूर्ण झाली आहे. शहरातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठीचे मलशुद्धीकरण केंद्र देखील अद्ययावत स्वरूपात या ठिकाणी उभे आहे. राज्यातील आदर्शवत असणारे पंढरपूरचे मलशुद्धीकरण केंद्र आहे. भविष्यात बेघरांसाठी दोन हजार घरांचा प्रकल्प देखील उभा करण्याचे काम सुरू झाले आहे. सर्व पातळ्यांवर विकासाचा मोठा निधी पंढरपुरला मिळत आहे.

भविष्यात या ठिकाणी चांगले हॉस्पिटल्स निर्माण व्हावेत डॉक्टरांची चांगली संख्या निर्माण व्हावी, तसेच लाखो वारकरी पंढरीत येत असताना येथे मेडिकल हब असावे. तसेच अद्ययावत क्रीडा संकुल देखील याठिकाणी उभा करण्याचा आपला मानस आहे. यासाठी समाजातील डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, प्राध्या,पक शिक्षक या सर्वांची साथ सोबत असणे गरजेचे आहे. याकरिताच सुधाकरपंत परिचारक यांना विधानसभेत पोहोचवून पंढरपूरच्या विकासाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

यावेळी डॉ. होरा ,डॉ. रोंगे , नागेश शिंगण ,  तानाजी सरदार , शिवाजी मेडसिंगकर, प्रताप चव्हाण , कैलास खुळे , ललिता कोळवले आदींची याप्रसंगी मनोगते झाली.

Pages