पंढरपूर / प्रतिनिधी
---------------------------
समस्त महादेव कोळी समाजाच्या अनेक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात प्रलंबीत होते, असे अनेक प्रश्न भाजपा शासनाच्या काळात मार्गी लागल्याने आम्ही बहुमताने भाजपास पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे उर्वरीत कामे मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आल्याने आम्ही बहुमताने भाजपाच्या पाठीशी आहोत. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकरपंत परिचारक मोठ्या फरकाने निवडून येतील. असा विश्वास महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केला. नुकताच त्यांनी महर्षी वाल्मिकी संघाचा पाठींबा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना जाहीर केला.
जातीच्या दाखल्यासह सध्या नोकरीस असणार्या कर्मचार्यांच्या बाबतीत तसेच विविध योजनांच्या बाबतीत जी आश्वासने राष्ट्रवादी शासनाने दिलेली होती ती त्यांच्या काळात पाळली गेली नाही. राष्ट्रवादीच्या काळात हजारो महादेव कोळी समाजाचे कर्मचारी कामावरुन कमी करण्यात आले. अनेकांनी दहा ते बारा वर्षे नोकरी केलेली होती, असे अनेक कर्मचारी कामावरुन काढल्याने त्यांचे संसार उध्दवस्त झाले. अनेकांना नोकरी सोडून मजुरी कामावर जाण्याची वेळ राष्ट्रवादी सरकारने आणली. त्यावेळी विरोधी पक्षात असणारे व सध्याचे मुख्यमंत्री यांनी भाजपा सरकार आल्यानंतर एकाही कर्मचार्यास कामावरुन कमी केले जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्याप्रमाणे फडणवीस सरकारने एकाही कर्मचार्यास नोकरीवरुन काढले नाही अथवा एकासही साधी नोटीसही बजावली नाही, हे मोठे काम भाजपाच्या काळात झाले. तसेच आमची जातीच्या दाखल्यांची मागणी होती ती तत्वत: मंजूर झालेली असुन त्यानुसार या काळात 200 पेक्षा जास्त जणांना जातीचे दाखले मिळालेले असून प्रलंबीत असलेले दाखलेही मंजूर करणार असल्याचे सांगितले आहे.
यामुळे प्रलंबीत असणारे सर्व प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या काळात मार्गी लागणार असल्याने समाजातील सर्व बांधवांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधाकर रामचंद्र परिचारक यांना भरघोष मतांनी निवडून देण्याचे आवाहन गणेश अंकुशराव यांनी केले. पाठींबा जाहीर केल्याबद्दल युटोपियन शूगर्स चे चेअरमन उमेश परिचारक यांनी महर्षी वाल्मिकी संघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीरभाऊ अभंगराव, राहुल परचंडे, संपत सर्जे,जयवंत अभंगराव, विनायक संगीतराव, संजय करकमकर, नवनाथ करकमकर, वैभव कांबळे, रामभाऊ सुरवसे, प्रकाश मगर, विकी संगीतराव, विकी अभंगराव, श्रीकांत बळवतकर, अभय अंकुशराव आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.