मंगळवेढा / प्रतिनिधी
------------------------------
बिना संस्कार नही सहकार ! बिना सहकार नही उद्धार !सहकारी संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा विकास होऊ शकतो हे महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारणानी सिद्ध करून दाखविलेली गोष्ट आहे. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारी हे त्यांचे उत्तम उदाहरण आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सहकारी बँका व सहकारी पतसंस्था याचा ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी जनतेला मोठा आर्थिक आधार आहे.माजी आमदार सुधाकरपंत परिचारक मालक यांनी सहकारात चांगले काम केलेले आहे.
त्यांनी पंढरपूर अर्बन बँक व पांडुरंग सहकारी साखर कारखाना या दोन सहकारी संस्था उत्तम प्रकारे चालून दाखवलेल्या आहेत. आम्हालाही सहकारात चांगले काम करावयाचे आहे.सुधाकरपंत परिचारक यांचे मार्गदर्शन आपणाला मिळावे व मंगळवेढा तालुक्यातील सहकारी क्षेत्र स्वच्छ व्हावे असे आम्हाला वाटते वाटते आहे.
म्हणून आम्ही बळीराजा परिवाराच्यावतीने सुधाकरपंत परिचारक यांना जाहीर पाठींबा देत आहे.