मंगळवेढा / प्रतिनिधी
------------------------------
पंढरपूर-मंगळवेढामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून माता-भगीनी काम करीत आहेत. फक्त शेती व्यवसाय करुनही उपजिवीका भागत नाही. सततची दुष्काळी परिस्थिती आहे. महिलांना शेतीमध्ये काम करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ही विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना आर्थिक स्थैर्य ,आर्थिक पाठबळ व मार्गदर्शन करण्याचे वचन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी दिले आहे.ते देगांव, शरदनगर, घरनिकी, मारापूर, गुंजेगांव, म.शेटफळ, ल.दहिवडी,लें.चिंचाळे, शिरसी, गोणेवाडी, खुपसंगी, जुनोनी, पाठखळ, आंधळगांव आदि ठिकाणी प्रचार दौ-याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
या प्रचार दौ-यामध्ये पंचायत समिती सभाती प्रदिप खांडेकर, मार्केट कमेटी सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी कारखान्याचे संचालक राजेंद्र सुरवसे,सुरेश भाकरे, विजय माने, बाळासो शिंदे,संजय पवार, ॲड.दत्तात्रय तोडकरी, धनंजय पाटील गुरुजी, लक्ष्मण मस्के,बिरा कोळेकर, मारुती गायकवाड, समाधान क्षिरसागर, भारत निकम, परमेश्वर येणपे, खंडू खंदारे,शिवाजी पटाप, औदुंबर मोरे, हिम्मत पाटील, सतिश मोहिते, रामभाऊ दोलतोडे, गजानन शिंदे, डॉ.लक्ष्मण गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना समाधान आवताडे म्हणाले, विद्यमान लोकप्रतिनिधींना दहा वर्षे संधी दिली, परंतु विकास काय केला हा सा-या जनतेचा प्रश्न आहे. फक्त गाठीभेटी घेतल्या किंवा संपर्क ठेवला म्हणजे विकास झाला असे जनतेने समजायचे का. मंगळवेढयातील एम.आय.डी.स.ची जमीन सौर उर्जा प्रकल्पाला दिली गेली. या ठिकाणा ऐवजी माळरानावर या प्रकल्पाला जागा दिली असती तर या मंगळवेढयातील जागेत अनेक लघु उद्योग उभारले गेले असते. अनेकांच्या हाताला काम मिळाले असते. परंतु दूरदृष्टीचा अभाव आणि वक्रदृष्टीचा दृष्टीकोण याला कारणीभूत आहे. आई वडिलांनी जन्म दिला, जेष्ठांनी तुम्लाला संस्कार दिले आहेत ,या मातीत तुम्ही रमला आहात आता वेळ आली आहे या मातीचे रुण फेडण्याची. शेतीला पाणी देतो, उद्योग-व्यवसाय उभे करतो. बस्स झाल्या आता तुमच्या या घोषणा. जनतेला जास्त दिवस तुम्ही फसवू शकत नाही. मतदार राजा आता हुशार झाला आहे. गट-तट बाजूला ठेवा , मतदारसंघाच्या विकासासाठी संधी द्या असे आवाहन उमेदवार समाधान आवताडे यांनी शेवटी केले.