पंढरपूर / प्रतिनिधी
----------------------–---
शहरातील मंदिर परिसर हा परिचारकांच्या बालेकिल्ला समजला जातो मंदिर परिसर परिचारकांच्या विरोधात कधीही जात नाही त्यामुळे या परिसरात श्रीमंत सांगतील तेच प्रमाण चालते असे ह.भ.प.वा.ना.उत्पात यांनी सांगितले. ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारार्थ पच्शिमव्दार येथील आयोजित कॉर्नर सभेत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मंदिर परिसरात कधीही जातीवाद नव्हता आणि नाही मागील प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या जाती धर्मातील उमेदवारांना या परिसरातील मतदारांनी भरघोस मते दिले आहेत यामध्ये मराठा समाजाच्या नगराध्यक्ष साधना भोसले, मुस्लिम समाजाचे नगरसेविका रेहाना बोहरी, पांडुरंग घंटी, अनिल अभंगराव हे ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळे विरोधकांच्या कसल्याही भुलथापांवर विश्वास ठेउ नका. दरम्यान मागील पंन्नासवर्षात पंढरपूरास चारित्रसंपन्न आमदार लाभले. एक सोडून अशी टीका नाव न घेता त्यांनी भालकेंवर केली. याच्या भ्रष्टाचाराचा मी आयवीटनेस आहे. मात्र ते आता काढत नाही.
त्यामुळे चारित्र्य संपन्न आमदारांच्या परंपरेच दुध नासल आहे. श्रीमंत सुधाकर परिचारक यांनी कधीही घाणेरड व जातीवाद करणार राजकारण केले नाही. त्यामुळे येत्या काळात परिचारकांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दलित आणि बहुजन समाजातील अनेक प्रश्न सुधाकर परिचारक यांनी मार्गी लावले आहेत. तर दलित समाजावर कधीही अन्याय होउ दिला नाही. त्यामुळे दलित आणि बहुजन समाजही परिचारकांना भरघोस मतदान करणारं असल्याचे गोविंद सर्वगोड यांनी स्पष्ट केले.
यासभेसाठी नगरसेवक अनिल अभंगराव, भाजपचे दत्ता राजपूत, रा.पा. कटेकर, अॅड. प्रकाश कुलकर्णी, डॉ. प्राजक्ता बेणारे, शिवसेनेचे संजय घोडके, माजी नगरसेवक शैलेश बडवे, विजय प्रताप मंचचे दिपक वाडदेकर, याभागातील शिरीष कटेकर, रवी मुळे, शंकर महाराज बडवे, साधना भोसले, बाबासाहेब बडवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाजपाचे बाबासाहेब बडवे, ह.भ.प.वा.ना. उत्पात, मदन महाराज हरिदास, अॅड. प्रकाश कुलकर्णी, नगरसेविका सुजाता बडवे, सुप्रीया डांगे, शकुंतला नडगीरे, बाबामहाजन बडवे, ॠषिकेश उत्पात, शैलेश बडवे, अर्बनचे संचालक विनायक हरिदास, सुधिर अभंगराव, शिवसेनेचे वैभव बडवे, पांडुरंग घंटी, रा.पा. कटेकर, विशाल डोके, नागेश भोसले, राजू सर्वगोड आदींसह मंदिर परिसरातील व्यापारी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.