अखेर एकादशीला झाला पंढरीच्या "विठ्ठला" चा विजय भारत नाना भालके यांचा ऐतिहासिक विजयाने हॅट्रिक - Pantnagari Times

Breaking News

Friday, October 25, 2019

अखेर एकादशीला झाला पंढरीच्या "विठ्ठला" चा विजय भारत नाना भालके यांचा ऐतिहासिक विजयाने हॅट्रिकमंगळवेढा / प्रतिनिधी

-------------------------------


               एकादशीला झालेल्या पंढरपूर-

मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील निवडणूक निकालात "पांडूरंग","विठ्ठल" व "दामाजी" या थोर संताच्या नावाने असणार्या कारखान्याचे विद्यमान चेअरमन निवडणूकीसाठी रिंगणात होते.21 रोजी झालेल्या मतदानानंतर 24 तारखेची प्रतिक्षा सर्वांना होती.आणि नेमकी निकालाच्या दिवशीच एकादशी असल्याने कोण विजयी होणार याची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच वारकरी मंडळे यांच्यासह मतदार संघातील जनता चर्चा करत असताना दिसत असतानाच एकादशीला "विठ्ठलाचा" विजय झाला आहे.

सुरुवातीला या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात प्रचार सभेच्या निमित्ताने संपुर्ण वातावरण ढवळून निघाले होते.एकमेकांना प्रचार सभेत आरोप-प्रत्यारोप करताना सर्वानी पाहीले होते.सुरवातीला सहज सोपी वाटणारी ही निवडणूक अंतीम टप्यात आल्यानंतर रोमहर्षक स्थितीत आली.

महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक व अपक्ष उमेदवार समाधान आवताडे हे दोन्ही उमेदवार लक्षणीय मत संख्या निर्माण करतील अशी अपेक्षा असतानाच पंढरपूर भागातून सुधाकरपंत परिचारक व भारतनाना भालके हेच मतदानात आघाडीवर राहीले.आणि समाधान आवताडे यांनी अपेक्षित असणारी मत संख्या त्यांना मिळवता आली नाही.

भालके व परिचारक यांच्यासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांनी येऊन प्रचार सभा घेतल्या.परंतु अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी कोणाचीही मदत न घेता जनतेच्या पाठिंब्याने आपला चांगला संपर्क ठेवला होता.परंतु दोन्ही तालुक्यातील सुज्ञ मतदारांनी परिचारक व आवताडे यांना नाकारत विद्यमान आमदार भारतनाना भालके यांना स्विकारले असल्याचे दिसत आहे. 

सुरवातीला मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस ही बॅकफुटवर होती.परंतु पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना ईडी ची आलेली नोटीस व त्यावर त्यांनी केलेली मात त्याचबरोबर सातारा येथील भर पावसात जोशपुर्ण केलेले भाषण हे तमाम महाराष्ट्रेतील मराठी माणसाला चांगलेच भावले होते.या वयातही पवार साहेब अशा पध्दतीने प्रचार करतात ही सहानभूतीची लाट सर्वत्र पसरली होती. त्याचबरोबर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील प्रमुख नेते मंडळी परिचारक गटात गेल्याने भारतनाना भालके यांना ही निवडणूक सुरवातीला अडचणीची वाटत असतानाच एकाकी पडलेले भालके हे जनतेच्या मनातील हिरो झाले.अन् इथेच त्यांना सर्व सामान्य मतदारांनी हॅट्रीकसह विजयाचा कौल दिला.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील सुज्ञ मतदार राजांनी तिसर्यादा निवडून देऊन आ.भालके यांच्यावर एक प्रकारे विश्वास ठेवला असून यापुढील काळात त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सुटले जावेत व दोन्ही तालुके सर्वच बाबतीत सुजलाम सुफलाम व्हावेत हीच मतदारांची माफक अपेक्षा आहे. परंतु एकादशी दिवशी पंढरीच्या विठ्ठलाचा विजय झाला हे मात्र नक्की...!

Pages