मंगळवेढा / प्रतिनिधी
-------------------------------
हुन्नूर ता. मंगळवेढा येथे सामाजिक बांधिलकी जोपासत दीपावली सणाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीचे मिस्टर सरपंच मच्छिंद्र खताळ यांनी येथील सर्व मुस्लिम बांधवांना दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले.
आज सकाळी मिस्टर सरपंच मच्छिंद्र खताळ, ग्रामपंचायत सदस्य सौदागर माने, मधुकर सूर्यवंशी, अनिल होनमाने, रावसाहेब कोरे, शहाजी सूर्यवंशी, मच्छिंद्र पुजारी, विकासभाऊ पुजारी, संतोष कदम, सुरेश क्षिरसागर, पांडुरंग शिंदे आदी उपस्थित होते.
गावामध्ये सुमारे तीस मुस्लिम बांधवांचे कुटुंब आहेत त्यांना दिवाळीचे फराळ कानुले, शंकरपाळे, चिवडा, लाडू, चकली, असे फराळाचे साहित्य सामाजिक बांधिलकी म्हणून वाटप करण्यात आल्याने मुस्लिम बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या