आयईएस परीक्षेत तांडोरचा हर्षल भोसले भारतात पहिला - Pantnagari Times

Breaking News

Saturday, October 26, 2019

आयईएस परीक्षेत तांडोरचा हर्षल भोसले भारतात पहिला



 मंगळवेढा / मदार सय्यद

--------------------------------------


                   केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (आयईएस) परीक्षेत तांडोर ता. मंगळवेढा येथील हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने देशात प्रथम क्रमांक मिळविला.त्याने पहिल्या प्रयत्नात हे यश मिळविले.आयोगाने संकेतस्थळावर नुकताच निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत तांडोर (ता. मंगळवेढा) येथील हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने देशात प्रथम क्रमांक पटकावला.

लोकसेवा आयोगातर्फे 2018 मध्ये झालेल्या परीक्षेसाठी जानेवारीत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. उत्तीर्ण  उमेदवारांचा सप्टेंबर- आक्टोंबर महिन्यात मुलाखतींचा टप्पा पार पडला होता. 

या परीक्षेंतर्गत 511 जागा रिक्त होत्या. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीच्या 161, यंत्र अभियांत्रिकीच्या 136, विद्युतच्या 108 व अणुविद्युत व दुरसंचार अभियांत्रिकी शाखेच्या 106 जागा रिक्त होत्या.या यशानंतर हर्षलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

तांडोर येथील त्याच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांसह नातेवाईक आणि मित्रपरिवाराने गर्दी केली होती. 

हर्षल पाच वर्षांचा असताना त्याचे वडील वारले होते त्यानंतर आईने शेती करून हर्षलचे शिक्षण पूर्ण केले.शालेय शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा,नववी ते दहावी माध्यमिक आश्रमशाळा देगाव,डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बीड,डिग्री गव्हर्नमेंट कॉलेज कराड येथे पूर्ण झाल्यानंतर भाभा अटॉमीक रिसर्च सेंटर मुंबई येथे एक महिन्याचे ट्रेनिंग घेऊन राजीनामा दिला.

त्यानंतर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन पुणे येथे निवड झाली.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने (इंजिनिअर सर्व्हिसेस) प्रिलिम जानेवारी महिन्यात व मिन्स परीक्षा जून महिन्यात दिली त्यानंतर मुलाखत सप्टेंबर महिन्यात झाली.शुक्रवार दि.२५ ऑक्टोबर रोजी निकाल लागला. त्यामुळे देशात पहिला येण्याचा मान मिळवला. गावात दीवाळीत ही गोड बातमी यैताच तांडोर ग्रामस्तातर्फे व मित्रमंडळीकडुन आतिषबाजी करुन व पेढे वाटुन आनंदउत्सव साजरा करण्यात आला.शनिवार 26/10/019 रोजी मा सरपंच रामचंद्र मळगे ग्रा.प.ताडोंर व ग्रामस्ततर्फे हर्षल न्यानेश्वर भोसलेचा यशवंतसभागृहात नागरी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन दयानंद सोनगे,नागनाथ कोळी,केराप्पा मळगे सर, मेजर मळगे,नवनाथ काबंळे,तानाजी गायकवाड,पत्रकार शिवाजी केंगार,अहमद शेख इसाक मिस्तरी, गावातील महीलावर्ग,व

ग्रामस्त उपस्थीत होते.


--------------------------

मी सामान्य कुटुंबातुन जि.प शाळेत शिकुन व माध्यमिक शिक्षण आश्रम शाळेत घेउन व इंजनिईरींग सरकारी कॅालेज कराड येते पुर्ण करुण पहील्या प्रयत्नात इंडीयन इंजनिरींग सर्व्हीस परीक्षेत भारतातुन पहीला आलो.त्याबद्दल मला माझ्या आईचे आशिर्वाद व ग्रामस्ताचे प्रोहत्साहान मिळाल्यामुळे मी हे यश प्राप्त करु शकलो.-------

हर्षल भोसले तांडोर.


-------------------------------------

हर्षल भोसले सपुर्ण भारतातुन U.P.S.C इंजनिंरीग परीक्षत पहीला आला. ही आम्हा तांडोर ग्रामस्ताना आभिमानाची गोष्ट आहे.त्याच्या या ऐत्यासिक निकालामुळे तांडोर गांवाच्या नावलौकीकात भर पडीली आहे.

भविष्यात तांडोर गांवात असेच अधिकारी निर्माण व्हावेत म्हणुन ग्रा.प.तांडोरतर्फे स्पर्धा परीक्षासाठी वाचनालय चालु करुन संदर्भ पुस्तके युवकाना उपलब्ध करुन देवु.

रामचंद्र मळगे मा.सरपंच तांडोर

Pages